‘एचए’ देणार महिनाअखेर देणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांना सर्व थकीत देणी महिनाअखेर दिली जातील, असे अधिकृत परिपत्रक हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स व्यवस्थापनाने गुरुवारी काढले. तसेच एचए को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला कामगारांच्या रकमा प्राधान्याने देण्याबाबत कळविण्याचेही आश्‍वासन दिले.

पिंपरी - स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांना सर्व थकीत देणी महिनाअखेर दिली जातील, असे अधिकृत परिपत्रक हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स व्यवस्थापनाने गुरुवारी काढले. तसेच एचए को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला कामगारांच्या रकमा प्राधान्याने देण्याबाबत कळविण्याचेही आश्‍वासन दिले.    

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

थकीत देणी मिळावी, यासाठी एचएच्या निवृत्ती कामगारांनी गुरुवारी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ यांच्याशी पुन्हा चर्चा केली. कंपनीचे अधिकारी अविनाश थोपटे, श्रीकांत दळवी आदींसह एचए मजदूर संघाचे सहसचिव प्रवीण मोरे, शंकर बारणे, संभाजी मुळीक, श्‍यामकांत पत्की उपस्थित होते. 

PHOTO : असा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत नवा झेंडा

बारणे म्हणाले, ‘‘कामगारांना भविष्य निर्वाह निधी, व्हीआरएसची रक्कम आणि थकीत वेतन ही देणी व्यवस्थापनाने दिली आहेत. मात्र, २५० कामगारांपैकी सुमारे १०५ कामगारांना व्हीआरएसची रक्कम अपुरी मिळाली आहे. याखेरीज ग्रॅच्युइटी, रजा रोखीकरण, बोनस, एलटीसी आणि एचए सोसायटीचे पैसे देणे बाकी आहेत. या उर्वरित सर्व रकमा ३१ जानेवारीपर्यंत देण्याचे आश्‍वासन व्यवस्थापनाने दिले आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Payments at the end of the month giving HA