PBA Election Result : पीबीएच्या अध्यक्षपदी ॲड. संतोष खामकर; तर ॲड. कुमार पायगुडे, ॲड. पवन कुलकर्णी उपाध्यक्ष

वादग्रस्त ठरलेल्या पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत (पीबीए) ॲड. संतोष खामकर अध्यक्षपदी निवडणूक आले आहे.
Adv. Santosh Khamkar
Adv. Santosh KhamkarSakal

पुणे - मतदार यादीतील घोळ, दोनदा लांबलेली निवडणूक आणि विद्यमान कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांवर केलेले आरोप यामुळे वादग्रस्त ठरलेल्या पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत (पीबीए) ॲड. संतोष खामकर अध्यक्षपदी निवडणूक आले आहे. बुधवारी (२१) निवडणूक झाल्यानंतर रात्री उशिरा सुरू झालेली मतमोजणी गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास संपली. उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपामुळे निवडणूक प्रक्रीया आणि मतमोजणीत देखील प्रचंड गोधळ झाला.

अ‍ॅड. अमित गिरमे आणि अ‍ॅड. संतोष खामकर यांच्यात अध्यक्षपदासाठी झालेल्या दुहेरी लढत झाली. त्यात ॲड. खामकर यांनी मोठ्या फरकाने विजयी मिळविला.

तर उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी सात उमेदवारांनी नशीब अजमावले होते. त्यात ॲड. कुमार पायगुडे आणि ॲड. पवन कुलकर्णी यांनी बाजी मारली. तसेच, सचिव पदांच्या दोन जागांसाठीची लढत सहा जणांमध्ये लढत होती. यात ॲड. मकरंद मते आणि ॲड. चेतन हरपळे विजयी झाले.

ऑडिटर पदासाठी अ‍ॅड. श्रद्धा कदम, अ‍ॅड. अजिंक्य खैरे, अ‍ॅड. केदार शितोळे यांच्यात निवडणूक झाली यात ॲड. श्रद्धा कदम यांची सगळ्यांना धोबी पछाड देत बाजी मारली. खजिनदार पदासाठी यापूर्वीच ॲड. प्रदीप चांदेरे पाटील यांची निवड झाली आहे.

पीबीएच्या सात हजार ९२३ सभासदांपैकी तीन हजार ९४७ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अ‍ॅड. दादाभाऊ शेटे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, तर अ‍ॅड. योगेश देशमुख उपमुख्य निवडणूक अधिकरी म्हणून कामकाज पाहिले. निवडणूक मुख्य आयुक्त ॲड. एन.डी पाटील यांना निवडणूक प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.

हे आहेत कार्यकारिणी सदस्य -

कार्यकारिणी सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. त्यामध्ये, अ‍ॅड. अजिंक्य महाडीक, अ‍ॅड. तेजवंती कपले, अ‍ॅड. आदित्य खांदवे, अ‍ॅड. शाहीन पठाण, अ‍ॅड. सोमनाथ पोटफोडे, अ‍ॅड. रोहित गुजर, अ‍ॅड. अक्षय शितोळे, अ‍ॅड. सूरज शिंदे, अ‍ॅड. स्वप्नील चांधेरे, अ‍ॅड. अंजली बांदल यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com