पिंपरी शहरासाठी  ‘पे & पार्क’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पिंपरी - महापालिका सर्वसाधारण सभेने शहरासाठी पार्किंग धोरण मंजूर केले आहे. त्यामुळे सर्व बीआरटी रस्ते, रेल्वे स्थानके, पिंपरी कॅम्प, बाजारपेठा आदी ठिकाणी आता ‘पे अँड पार्क’ सुविधा असेल.  

शहराची पार्किंग पॉलिसी ठरविण्यासाठी दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई, बंगळरू व नागपूर आदी शहरांचा अभ्यास केला आहे. वाहनांचे वर्गीकरण करून पार्किंग शुल्क ठरविले आहे. त्यासाठी शहराची चार झोनमध्ये विभागणी केली आहे. 

पिंपरी - महापालिका सर्वसाधारण सभेने शहरासाठी पार्किंग धोरण मंजूर केले आहे. त्यामुळे सर्व बीआरटी रस्ते, रेल्वे स्थानके, पिंपरी कॅम्प, बाजारपेठा आदी ठिकाणी आता ‘पे अँड पार्क’ सुविधा असेल.  

शहराची पार्किंग पॉलिसी ठरविण्यासाठी दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई, बंगळरू व नागपूर आदी शहरांचा अभ्यास केला आहे. वाहनांचे वर्गीकरण करून पार्किंग शुल्क ठरविले आहे. त्यासाठी शहराची चार झोनमध्ये विभागणी केली आहे. 

तसेच, मंजूर विकास आराखड्यांतील वाहनतळांची आरक्षणे विकसित करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. तिथे वाहनतळ विकसित केल्यानंतर पार्किंग दर नजीकच्या झोनच्या २५ टक्के कमी असतील. पार्किंग शुल्क व पार्किंग रस्ते यांच्या दरात दोन वर्षांनी आढावा घेऊन योग्य बदल केले जातील. तसेच, पार्किंग ॲप (parking app) तयार करून नियंत्रण ठेवले जाणार आहे.

दृष्टिक्षेपात धोरण
पार्किंग ठरलेल्या रस्त्यांलगतच्या सर्व रस्त्यांसाठी १०० मीटरपर्यंत
रात्री ११ ते सकाळी ८ या वेळेत रात्र पार्किंग नियोजन, वार्षिक पास सुविधा
गावठाणे, झोपडपट्टीत पार्किंग पॉलिसी नसेल. दोन वर्षांनी त्यावर विचार 
सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षाथांब्यांना सवलत
क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पार्किंग शुल्क वसुलीसाठी ठेकेदारांची नेमणूक 

कोण काय म्हणाले...
निर्मला गायकवाड - महापालिका मुख्यालयात पार्किंग व्यवस्था करा
मीनल यादव - उड्डाण पुलांखालील टपऱ्या हटवून पार्किंग करा
संदीप कस्पटे - सीसीटीव्ही व अग्निशामक यंत्रणा असावी
सीमा सावळे - व्यावसायिक, मॉल यांच्यावर कारवाई करावी 
माई ढोरे - ट्रॅव्हल कंपन्यांच्या बससाठी पार्किंग सक्तीची करावी
योगेश बहल - आयटूआरच्या दोन हेक्‍टर जागेवर धोरण राबवावे
मंगला कदम - एमआयडीसी व प्राधिकरणातील जागा ताब्यात घ्या
आशा शेंडगे - पार्किंग असणाऱ्यांनाच वाहन घेण्यास परवानगी द्यावी 
दत्ता साने - पार्किंग धोरणाला राष्ट्रवादीचा विरोध
राहुल कलाटे - सार्वजनिक वाहतूक सक्षम करा
सचिन चिखले - निगडीतील अतिक्रमणे हटवा
एकनाथ पवार - नागरिकांच्या सोयीसाठी धोरण असून, दर दोन वर्षांनी आढावा घेऊ

येथे असेल पार्किंग
दापोडी-निगडी, नाशिक फाटा-वाकड, सांगवी-किवळे, काळेवाडी फाटा- देहू-आळंदी रस्ता, भक्तीशक्ती- मुकाई चौक, देहू-आळंदी हे बीआरटी रस्ते.
पिंपरी कॅम्प, भोसरीगाव, नाशिक फाटा उड्डाण पूल. कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर. प्राधिकरणातील सर्व रस्ते. भूमकर चौक ते केएसबी चौक रस्ता.

अशी वाढली वाहने
२००१

दुचाकी - १,६४,५९८
चारचाकी - २०४८९
अन्य वाहने - २५,४७८
एकूण - २,१०,५६५

२०११
दुचाकी - ५,३७,९२०
चारचाकी - ९०,३४६
अन्य वाहने - ७५,२१०
एकूण -  ७,०३,४७६

२०१७
दुचाकी - ११,६९,८३४
चारचाकी - २,५४,९३३
अन्य वाहने - १,४३,८४०
एकूण - १५,६८,६०७

Web Title: PCMC Pay & park issue