महापालिकेचे वाहन वापरणार नाही - पवार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

पिंपरी - जनतेच्या सेवेसाठी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी भाजपला सत्ता दिली आहे. यामुळे सत्तारूढ पक्षनेत्याला महापालिकेकडून मिळणारे वाहन वापरणार नाही, असे भाजपचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी बुधवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्तारूढ पक्षनेतेपदाची सूत्रे एकनाथ पवार यांनी बुधवारी स्वीकारली. त्या वेळी भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, भीमा बोबडे उपस्थित होते. पवार म्हणाले, ""पिंपरी- चिंचवडमधील नागरिकांनी भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता दिली आहे. ही सत्ता जनतेच्या सेवेकरिता आहे. महापालिकेकडून पदाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये मोटार, चालक आणि इंधनाची सुविधादेखील आहे. या सुविधेचा मी त्याग करणार आहे. कारण त्यामुळे महापालिकेची दरमहा सव्वालाखापर्यंत बचत होणार आहे. हा उपक्रम माझ्यापासून सुरू करीत आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची ही एक सुरवात आहे. अन्य पदाधिकाऱ्यांनी ही अशीच बचत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.'' 

Web Title: PCMC vehicle not using - Pawar