
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (पीडीसीसी) मार्च २०२० अखेर तब्बल २७३ कोटी २६ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. यामुळे पुणे जिल्हा बँक ढोबळ नफ्यात सलग दुसऱ्या वर्षी देशात अव्वल ठरली आहे. देशातील सर्वाधिक नफ्याचा स्वत:चाच विक्रम बँकेने मोडला आहे.
जिल्हा बँकेला गतवर्षी २२० कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला होता. यावेळीही ही बँक ढोबळ नफ्यात देशात अव्वल ठरली होती. यंदा त्यात आणखी ५३ कोटी २६ लाख रुपयांची भर पडली असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी शनिवारी (ता.१८) सांगितले.
दरम्यान, यंदा जिल्हा बँकेने ठेवींच्या दहा हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यंदा या ठेवी दहा हजार ९७ कोटी ६७ लाखांवर पोहोचल्या आहेत. बँकेची वार्षिक उलाढाल १६ हजार ९३५ कोटी ६६लाख झाली आहे. बँकेचे दहा हजार ९२७ सभासद आहेत. आतापर्यंत सहकारी साखर कारखाने, पतसंस्था आणि वैयक्तिक कर्जदारांना मिळून सहा हजार ८६७ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा बँकेच्या कर्जदार संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आणि शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेत केली. शिवाय पदाधिकारी, अधिकारी आणि संचालक मंडळाने नेहमीच बँकेच्या हिताला प्राधान्य दिले. त्यामुळे बँकेच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. त्यात आता ढोबळ नफ्याच्या विक्रमाची भर पडली आहे.
- रमेश थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा बँक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.