Pune : पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीतून हाकालपट्टी ; प्रदिप गारटकर

त्यांची भाजपशी जवळीक झाल्याचे लक्षात आले. अजित पवार यांनी मला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अधिकृत पॅनल उभा करण्याचा आदेश दिला होता. त्यांच्या आदेशानुसार मी अनेकवेळा दांगट यांच्याशी पॅनल करण्याविषयी चर्चा केली.
Pune pdcc
Pune pdcc sakal

प्रवीण डोके

पुणे - कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेच्या (हवेली) पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम करत आहेत. त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष या नात्याने दांगट यांनी हकालपट्टी करीत असल्याचे गारटकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे हवेली तालुक्यात ग्रामपंचायत आणि सोसायटी विभागात प्राबल्य असून ही निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासाठी अत्यंत सोपी होती.

असे असताना आणि त्यांच्याकडे पक्षाच्या पॅनलबाबत सातत्याने विचारणा करत असताना त्यांनी असा पक्षाला सोडून का निर्णय घेतला. याचा विचार केला असता, त्यांची भाजपशी जवळीक झाल्याचे लक्षात आले. अजित पवार यांनी मला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अधिकृत पॅनल उभा करण्याचा आदेश दिला होता.

Pune pdcc
Pune Accident: किंचाळण्याचा एकच कल्लोळ अपघातात जखमी महिलेने सांगितला थरारक अनुभव

त्यांच्या आदेशानुसार मी अनेकवेळा दांगट यांच्याशी पॅनल करण्याविषयी चर्चा केली. परंतु, त्यांनी कायम भाजपच्या काही उमेदवारांसाठी आणि मागील संचालक मंडळात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता, त्यांच्यासाठी ते आग्रही राहिले असल्याचे गारटकर यांनी सांगितले.

एक वर्षापुर्वी झालेल्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रकाश म्हस्के आणि दांगट यांची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. दोघे राष्ट्रवादीचे परंतु त्यांच्यात एकमत होत नसल्याच्या कारणावरुन शेवटच्या क्षणी नाईलाजास्तव हा निर्णय पक्षाला घ्यावा लागला होता.

त्या निवडणुकीत पक्षाच्या अनेक मान्यवरांनी दांगट यांचे उघडपणे काम केले होते. त्यामुळेच ते विजयी झाले होते, याची जाणीव दांगट यांनी ठेवलेली दिसत नाही.

अजित पवार यांच्याविषयी चुकीच्या बातम्या पेरल्या

मागील दोन महिने अजितदादांविषयी चुकीच्या बातम्या पेरुण सर्वांची दिशाभुल करण्याचे काम दांगट यांनी सातत्याने केले असल्याचा आरोपही गारटकर यांनी यावेळी केला.

पक्षविरोधी कारवायांबद्दल विकास दांगट यांची पक्षातून हाकालपट्टी करीत आहे. हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे पक्षविरोधी भूमिका घेऊन काम करत आहेत.

त्यांनी पक्षविरोधी कारवाया थांबवाव्यात, अन्यथा त्यांच्यावर देखील कारवाई करावी लागेल. शरद पवार यांच्या जिल्ह्यात पक्षाच्या अधिकृत पॅनल विरोधात जाऊन पक्षालाच आव्हान देण्याची भूमिका अंत्यत चुकीची आहे. पक्षाची शिस्त सर्वांसाठी बंधनकारक आहे.

- प्रदिप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com