PDCC Clerk Recruitment
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) क्लार्क भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर झाला असला, तरी उमेदवारांना त्यांचे मिळालेले गुण (स्कोअर कार्ड) न समजल्याने या संपूर्ण भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लेखी परीक्षा, मुलाखत आणि एकूण गुणांचे विवरण जाहीर न करताच थेट निवड यादी प्रसिद्ध करण्यात आल्याने हजारो रुपये फी भरून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांचे गुण, गुणवत्ता निकष आणि अंतिम कट-ऑफ अधिकृतपणे प्रसिद्ध करावेत, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.