'पीडीपी आणि भाजपने काश्मीरचे राजकारण बिघडविले'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 जानेवारी 2019

संवाद नसल्याने सामान्य भारतीयांना काश्मीरचे मुख्य प्रश्नच माहित नाही. पीडीपी आणि भाजप या दोन विरोधी विचारांच्या पक्षांनी येथील राजकिय परिस्थिती अजून बिघडवली आहे. - डॉ. शहा फैजल​

पुणे : 'जम्मू काश्मीर मध्ये दोन विरोधी विचारांचे पक्ष एकत्र आल्याने मागील पाच वर्षांमध्ये येथील अडचणीत आणखी वाढ झाली. 2018 मध्ये काश्मीर मध्ये सर्वात जास्त हिंसाचार झाला आहे,' असे मत आताच प्रशासकीय सेवेतून निवृत्ती घेतलेलले अधिकारी डॉ. शहा फैजल यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे वतीने आज (ता. 31) वार्तालापाचे आयोजन केले होते. तेथे डॉ. फैजल बोलत होते. पुढे ते म्हणाले, 'तिथे रोज लोक मरत आहे. जम्मू काश्मीर मधील राजकीय परिस्थिती येथील राजकारण तरुणाईला धरून नाही. मतदानास पात्र असून येथील तरुण निवडणुकीत मतदान करत नाहीत. म्हणून मला तरुणांना सोबत घेऊन योग्य दिशेने राजकारण करायचे आहे. जे तरुण निवडणूकीच्या विरोधात उभे राहिले आहेत, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना एकत्र करायचे आहे. काश्मिरी पंडित माझ्याशी सहमत आहेत. '

कलम  370 विषयी बोलून काही अर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,
'हा राजकीय प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून तो तसाच आहे. संवाद नसल्याने सामान्य भारतीयांना काश्मीरचे मुख्य प्रश्नच माहित नाही. पीडीपी आणि भाजप या दोन विरोधी विचारांच्या पक्षांनी येथील राजकिय परिस्थिती अजून बिघडवली आहे.'

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PDP and BJP have spoiled Kashmirs politics