चौराई डोंगर परिसरात मोरांचे अस्तित्व धोक्‍यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

तळेगाव दाभाडे (स्टेशन) - पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव लिंब फाट्यासमोर चौराई डोंगरावर पक्षांचा राजा समजल्या जाणाऱ्या मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. दाणापाण्याच्या शोधात ते पायथ्याशी येतात. मात्र, भटक्‍या कुत्र्यांच्या वावरामुळे त्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक व पक्षिप्रेमींनी केली आहे. 

तळेगाव खिंड ते उर्से खिंडीपर्यंत सुमारे पाच किलोमीटर अंतर चौराई डोंगर आहे. घणदाट झाडीने व हिरव्यागार दाट वृक्ष-वेलींनी डोंगर बहरला आहे. त्यात मोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज सकाळ-सायंकाळी डोंगराच्या पायथ्याशी मोरांचे थवे जमू लागतात. मात्र, भटकी कुत्री त्यांची शिकार करण्यासाठी त्यांच्या मागे धावतात. काही मोर आश्रयाला झाडावर जाऊन बसतात, तर एखादा मोर कुत्र्यांची शिकार बनतो. 

मद्यपींच्या पार्ट्या 
चौराई डोंगराच्या पायथ्याशी सायंकाळी काही तळिराम पार्ट्या झोडतात. तेथे मद्य पिऊन मांसाहार करतात. उष्टे-खरकटे तेथेच टाकले जात असल्याने कुत्र्यांचा वावर वाढला आहे. थंडीच्या मोसमात मोरांची पिसे झडू लागतात; मग हेच तळिराम पिसे गोळा करण्यासाठी डोंगरावर फिरतात. 15 ते 20 रुपयाला एक पिस विकले जाते. पार्ट्या करणाऱ्यांची संख्याही वाढली असून, मोरांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे.

Web Title: Peacock threatened in chorai dongar aera

टॅग्स