esakal | 'हिंदी'च्या प्राध्यापकांना मिळणार ‘पेडॅगोजी’ प्रशिक्षण; पुणे विद्यापीठाचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Pedagogy training for Hindi professor under the initiative of Pune University

कोरोना  लाॅकडाऊन संपल्यानंतर पहिली कार्यशाळा पुणे जिल्ह्यातील प्राध्यापकांसाठी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये होणार आहे, असे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी सांगितले.

'हिंदी'च्या प्राध्यापकांना मिळणार ‘पेडॅगोजी’ प्रशिक्षण; पुणे विद्यापीठाचा पुढाकार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे: भाषा विषय शिकताना विद्यार्थ्यांना विषय व्यवस्थित समजावा व त्यांचे कुतुहल वाढले पाहिजे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे महाविद्यालयांमधील शिक्षकांना अध्यापन पद्धतींचे (पेडॅगॉजी) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे वर्गातील विद्यार्थांची गळतीही थांबणार आहे. पुणे, नाशिक व अहमदनगर अशा तीनही जिल्ह्यांमध्ये कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना  लाॅकडाऊन संपल्यानंतर पहिली कार्यशाळा पुणे जिल्ह्यातील प्राध्यापकांसाठी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये होणार आहे, असे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी सांगितले.

Lockdown : रेशनवर धान्य मिळेना; लेकरांना काय खायला द्यायचे?
भाषा विषय शिकवताना जितक्या जास्त अध्यापन पद्धतींचा वापर करू विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास होतो. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच कौशल्यांचा विकास करणे हेसुद्धा शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ  काव्यपाठ शिकवताना चित्र विधी, संगीत, गितीनाट्य, दृकश्राव्य, प्रत्यक्ष काव्यपाठ या पाच अध्ययन पद्धतीचा वापर केल्यास  विद्यार्थ्यांना विषय समजणे सोपे जाते, तासांना कंटाळा येत नाही. त्यामुळेच या पद्धती  प्राध्यापकांना पेडॅगाॅजीचे प्रशिक्षण देण्यासाठीच हा उपक्रम राबवला जाणार आहे.
Coronavirus : बारामतीतील 'त्या' आठ जणांचे रिपोर्टस् समोर; ते सर्वजण...
याबाबत विद्यापीठाने तीनही जिल्ह्यांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठाचा हिंदी विभाग, संलग्न महाविद्यालयांमधील हिंदी अभ्यास मंडळांच्या माध्यमाचा उपयोग करून घेण्यात येणार आहे, असे डॉ. सदानंद भोसले यांनी सांगितले.

loading image