कोरोनाचा उद्रेक असला तरी 'ही' आहे आशादायक बातमी

Pediatrician Dr Sharad Agarkhedkar talks about A vaccine that prevents coronavirus infection
Pediatrician Dr Sharad Agarkhedkar talks about A vaccine that prevents coronavirus infection
Updated on

पुणे : कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे सर्वत्र निराशेचे वातावरण निर्माण होत असताना एक आशादायक बातमी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय. ती म्हणजे करोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंधक ठरलेली लशीची! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लसी निर्माण करण्याची प्रक्रिया तीन टप्प्यांची असते. त्यात प्रयोगशाळेतील चाचण्या हा पहिला टप्पा असतो. दुसरा टप्प्यात तयार केलेली लस प्राण्यांना दिली जाते. त्याचा प्राण्यांवर कोणता परिणाम होतो, याची निरीक्षण बारकाईने नोंदविण्यात येतात. या दुसऱया टप्प्यातील चाचण्यांच्या निष्कर्ष चांगले असतील. तर, तिसऱया टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळते. या तिसऱया टप्प्यात मानवाला ही लस दिली जाते. त्यात लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासली जाते. 

VIDEO - पुण्यात हॉस्पिटलमध्ये बेडसाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ

या तीनही टप्प्यातील पुढे गेलेल्या आँक्सफर्ड कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीबद्दल अधिक माहिती देताना बालरोग तज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर म्हणाले, “आँक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अँस्टॅजेनेका आणि पुण्याची सिरम इन्स्टिट्युट आँफ इंडिया यांनी एकत्र येऊन लस निर्माण केली आहे. त्यासाठी चिंपांगी अँडिनो व्हायरस याच्याशी बायो इंजिनियरिंगच्या माध्यमातून संयोग करून ही लस तयार करण्यात आली आहे. त्याचे प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाले. त्यानंतर 7 एप्रिलपासून माननवावरील चाचण्या सुरू झाल्या. एकूण एक हजार 77 माणसांवर ही चाचणी करण्यात आली. लस दिल्यानंतर दोन आठवड्यात त्या माणसांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याचे निरीक्षणातून दिसले. कोरोना विषाणूंना शरीरात संसर्ग होण्यास विरोध करणाऱया अँटिबॉडीजची संख्या लस दिल्यानंतर 28 दिवसांमध्ये वाढते. म्हणजेच विषाणूंनापासून संरक्षण मिळत असल्याचा निष्कर्ष मानवी चाचणीतून निघाला. ज्या लोकांना दोन लसीचे दोन डोस दिले होते त्यांना 56व्या बुस्टर रिस्पॉन्स मिळाला. त्यांच्यामध्ये लशीचा 100 टक्के फायदा मिळाला. त्यामुळे ही लस विषाणूंपासून माणसाचे संरक्षण करते, हे अधोरिखेत झाले.” 

पोलिस काढणार रेखाचित्रातून आरोपींचा माग; पाच दिवसांच्या अभ्यासक्रमाची सुरुवात

''अमेरिकेमध्ये पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील चाचण्यांचे यशानंतर मानवी चाचणी सुरू झाली आहे. दक्षिण अफ्रिका आणि ब्राझीलमध्ये लहान मुलांवरील चाचण्यांनादेखिल सुरवात झाली. 30 हजार लोकांवर या चाचण्या करण्यात येणार. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध होईल'', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या लसीतून वेगाने फैलवाणाऱया कोरोना विषाणूंचा उद्रेक नियंत्रत करण्यात यश येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com