साठ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई 

kailash1.jpg
kailash1.jpg


पुणे ः मुंढवा येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सीमाभिंतीलगत बधे वस्तीवर रिक्षाचालक मनमानी करून रस्त्यावर व पदपथावर रिक्षा लावून व्यवसाय करत होते. त्यामुळे वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होतो, अशा आशयाचे वृत्त "सकाळ'मध्ये (ता. 25 ऑक्‍टो.) प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन मुंढवा वाहतूक विभागाने साठ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली. 

बधे वस्तीसमोरील पदपथासह रस्त्यावरच रिक्षा उभ्या करून चालक प्रवाशांची वाट पाहतात. त्यामुळे निम्मा रस्ता व्यापला जात असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून मुठीत जीव धरून चालावे लागते. बेशिस्त रिक्षाचालकांमुळे पादचाऱ्यांसह वाहनचालक त्रस्त झाले असल्याच्या वृत्ताची दखल घेत साठ रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 28 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुंढवा वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक सागर गरूड यांनी दिली. 

रिक्षाचालकांकडे परवाना नसणे, गणवेश नसणे, नो पार्किंग, डबल पार्किंग, तसेच अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यातील दोन रिक्षा वाहतूक विभागाकडे जमा करण्यात आल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com