पुणेकरांनो, मास्क लावताय ना? नाहीतर....

दिलीप कुऱ्हाडे
शनिवार, 23 मे 2020

मास्क न लावणाऱ्या पुणेकरांना दंड करावा कि दंडुके द्यावेत असा संभ्रम पुणे महानगरपालिकेच्या विधी विभागामध्ये निर्माण झाला आहे.

une-news">पुणे : कोरोनाचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत असल्यामुळे मास्क न लावणाऱ्या पुणेकरांना दंड करावा कि दंडुके द्यावेत असा संभ्रम पुणे महानगरपालिकेच्या विधी विभागामध्ये निर्माण झाला आहे.  दंड लावण्याचा अधिकार पोलिसांना आहे.

पुण्यात पुन्हा टोळी युद्ध, `या` गुंडाचा खून

त्यामुळे महानगरपालिकेच्या विधी समितीमध्ये मास्क न लावणाऱ्यांवर काय ठोस कारवाई करावी. याबाबत अद्याप तोडका निघाला नाही. त्यामुळे दंडापेक्षा दंडुके दिले तरच पुणेकर सुधारतील असा काहींनी सूर आळवला. पुणेकर हेल्मेट घालत नसल्याचे सर्वश्रृत आहे. त्यामुळे पुणेकर मास्क घालतीलच कशावरून या बाबत नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या विधी समितीमध्ये चर्चा रंगली होती.

बापरे... पुणे कॅन्टोन्मेंटच्या एकाच वाॅर्डात 101 कोरोनाबाधित

दंड करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. त्यामुळे महानगरापलिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार मिळेल का याची चाचपणी सुरू केली आहे. तर काही जणांनी पुणेकर दंड भरतील पण मास्क लावणार नाहीत. त्यावर काय तोडा काढायचा असा प्रश्‍न विचारला. त्यावर दंडापेक्षा दंडुक्याची मात्रा परिणामकारक असल्याचा सूर काहींनी आळवला. त्यामुळे नागरिकांना शिस्त लागले. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव होणार नसल्याचे मत पुढे आले.

पुण्यातील इतर बातम्यासाठी येथे- क्लिक करा

सार्वजनिक ठिकाणी तंबाखु, गुटखा खाऊन थुंकल्यास आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार आहे. दंड करून सुद्धा नागरिक सुधारत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर मोठ्या दंडाची तरतूद करणे व त्याची कडक अंमलबजावणी केल्यास कोरोनाच्या संसर्गावर काही प्रमाणात प्रतिबंध करता येऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Penalties for not wearing a mask in pune