पुण्यात पुन्हा टोळी युद्ध, `या` गुंडाचा खून...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

शोएब याच्या विरूध्द हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत व शहरात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने तोंडावर, शरीरावर ठिकठिकाणी वार केल्याने तो गंभीर जखमी झाला व या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ​

une-news">पुणे) :  मागील वर्षी मारहाण केल्याच्या रागातुन टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन खून केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता हडपसरमधील भेकराईनगर येथे घडली. दरम्यान, खून झालेला तरुण व संशयित आरोपी हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या शोएब शेख (वय 19, रा.बैंक ऑफ महाराष्ट्रच्यामागे भेकराई नगर, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नीलेश भाऊसाहेब मेमाणे (वय 26 रा. भेकराई नगर, हडपसर) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन जीवन कांबळे व त्याच्यासाथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

शोएब परिसरात सरकार राज नावाची टोळी चालवायचा. काही महिन्यापूर्वी वर्चस्व वादातून कांबळे याच्यावर शोएब याने वार केले होते. या रागातूनच कांबळे व त्याच्या साथीदारांनी त्याचा खून केला.कांबळे देखील पोलिसांच्या रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. वर्चस्व वादातूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

 महत्त्वाची बातमी : घरेलू कामगारांना सोसायटीची दारे खुली

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब शेख व जीवन कांबळे हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. शोएबच्या नावावर मारहाणीचे 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत, तसेच कांबळे याच्या नावावर देखील गुन्हे दाखल आहेत. शोएबने मागील वर्षी जीवनला मारहाण केली होती. त्यावरुन दोघात वर्षभरापासून धुसफुस सुरु होती. दरम्यान शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता शोएब त्याचा मित्र फिर्यादी नीलेश मेमाणे याच्यासमवेत दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी जीवन व त्याच्या साथीदारांनी भेकराई नगर येथील सासवड रोडवर असलेल्या शारदा हॉस्पिटलजवळ गाठले. त्यांनी शोएबच्या तोंडावर व शरीरावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला, त्यास रुग्णलयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला.

अजितदादांना पुण्याच्या महिला अधिकाऱ्याने दिल्या कोरोना मॅनेजमेंटच्या 'टिप्स'

शोएब याच्या विरूध्द हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत व शहरात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने तोंडावर, शरीरावर ठिकठिकाणी वार केल्याने तो गंभीर जखमी झाला व या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. 

पुण्यातील एका सोसायटीतील `एवढ्या` जणांचे कोरोना रिपोर्ट...

या घटनेनंतर परीमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, हडपसर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of one criminal in hadpasar