शिपायानेचे चोरली कार्यालयातील दोन लाखांची रक्कम 

4thief_13.jpg
4thief_13.jpg

पुणे : खासगी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या शिपायाने कार्यालयाच्या कपाटात ठेवलेली तब्बल दोन लाख रुपयांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात संबंधीत कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी प्रसाद उनवने (वय 44, रा.धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन अतुल पांडुरंग बुरुडकर (रा. गाडगेबाबा नगर, नागपुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मुकुंदनगर येथील प्रभात प्रिटींग प्रेस या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आयएएसएस नावाचे कार्यालय आहे.संबंधीत कार्यालयामध्ये बुरूडकर हा काही वर्षांपासून शिपाई म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी कार्यालयातील कपाटामध्ये दोन लाख रुपयांची रक्कम ठेवली होती. फिर्यादी हे काही कामानिमित्त बाहेर गेले असताना बुरूडकर याने त्यांच्या कपाटातील दोन लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com