कायद्याच्या सल्ल्याची नाही, तर लोकांना समुपदेशनाची गरज!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

'लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. व्यवसायाला बसलेला फटका त्यामुळे आर्थिक चणचण आणि कुटुंबातील ताणतणाव यामुळे अनेक लोकांना मानसिक त्रास तसेच घटस्फोटापर्यंतचे प्रमाण वाढत आहेत. अश्यात कायद्याचे सल्ले देण्या ऐवजी लोकांना मानसिक आधार आणि समुपदेशनाची गरज आहे." असे मत उच्च न्यायालयाचे ॲड. अभय नेवगी यांनी व्यक्त केले.

पुणे - 'लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. व्यवसायाला बसलेला फटका त्यामुळे आर्थिक चणचण आणि कुटुंबातील ताणतणाव यामुळे अनेक लोकांना मानसिक त्रास तसेच घटस्फोटापर्यंतचे प्रमाण वाढत आहेत. अश्यात कायद्याचे सल्ले देण्या ऐवजी लोकांना मानसिक आधार आणि समुपदेशनाची गरज आहे." असे मत उच्च न्यायालयाचे ॲड. अभय नेवगी यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिवर्तन संस्थेच्या वतीने 'मनोबल' या आत्महत्याविरोधी हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईन सेवेचा लोकार्पण सोहळा ऑनलाईन माध्यमातून झाला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, उद्योजक व इंडो स्कॉटलचे अध्यक्ष विजय पुसाळकर, मनोविकारतज्ञ डॉ. हमीद दाभोलकर, मनोविकारतज्ञ डॉ. सुदीप्तो चॅटर्जी आदी उपस्थित होते. सध्या आत्महत्यांचे प्रमाण तसेच लॉकडाऊनमुळे मानसिक त्रास याचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या मनातील सर्व चिंता दूर करण्यासाठी व त्यांना समुपदेशन देण्याकरिता 'मनोबल' हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही सेवा मोफत असून नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध आहे.

हॉटेल-मॉल सुरू झाल्यानंतर शहरात कसं होतं वातावरण? वाचा सविस्तर

यावेळी ॲड. नेवगी म्हणाले, "लॉकडाऊन जाहीर झाल्यावर पुस्तके वाचून तसेच कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालविण्याचे ठरवले होते. मात्र या काळात रात्री उशिरा सुद्धा कारखाने बंद झाल्यापासून ते घटस्फोट सारख्या गोष्टींपर्यंत लोकांचे फोन यायला लागले. यावेळी असे समजले की लोकांमध्ये त्यांचे भविष्य कसे असेल याची चिंता उद्भवू लागली आहे. अश्यात त्यांना सर्वाधिक मानसिक आधाराची व योग्य सल्ल्यांची गरज असल्याने या हेल्पलाईन सेवेची कल्पना आली व त्याबाबत डॉ. हमीद यांच्याशी चर्चा केली. तर आज ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध झाली असून ही फक्त मराठीतच नाही तर हिंदी, इंग्रजी सारख्या भाषांमध्येही उपलब्ध व्हावी. मानसिक त्रासाची समस्या आज संपूर्ण देशात वाढत आहे त्यामुळे विविध भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध होणे गरजेची आहे."

Breaking : अखेर 'टीईटी'चा निकाल जाहीर; 'इतके' शिक्षक ठरले पात्र

"गेल्या सहा महिन्यात विविध क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. कोणतेच उत्पन्न झाले नसल्याने लोकांच्या चिंताही वाढू लागल्या आहेत. अश्यात धर्म जात या गोष्टी बाजूला ठेवत अश्या लोकांची मदत करणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांना मानसिक आधार देणे हे महत्वाचे झाले आहे."
- सोनाली कुलकर्णी, सिने अभिनेत्री

"लॉकडाऊनमुळे आज लोकांमध्ये समुपदेशनाची गरज वाढली आहे. तसेच एकूण युवकांमध्ये वाढणारे आत्महत्येचे प्रमाण याला कमी करण्यासाठी देखील पाऊल उचलणे गरजेचे होते. या हेल्पलाईनमुळे नक्कीच लोकांची मदत होईल.
- डॉ. हमीद दाभोलकर, विश्वस्त - परिवर्तन संस्था

येथे साधा संपर्क
मनोबल हेल्पलाईन : 7412040300

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People need counseling, not legal advice