शनिवारवाडा झुंझतोय दुरवस्थेविरुध्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे : देशात अठाराव्या शतकात विस्तारलेल्या मराठा साम्राज्याच्या कारभारचे केंद्र असलेली शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झालेली आहे. मात्र, महापालिका आणि भारतीय पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शनिवारवाड्याची दुरवस्थेकडे महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न काही पुणेकर ट्विटरच्या माध्यमातून सात्यत्याने करत आहे. तरीही महापालिकेने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही.

भारतीय पुरातत्व विभाग आणि पालिकेच्या या दुर्लक्षित आणि बेजबाबदार कामकाजाबाबत स्तंभलेखिका शेफाली वैद्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज टिका केली. ''शनिवारवाड्याची दुरवस्था पाहून दु:ख वाटते. भारतीय पुरातत्व विभाग आणि पालिका काय करत आहे ? असा जाब विचारत त्यांनी नाराजी व्यक्त केली

''शनिवारवाड्यची देखभाल अतिशय गलथानपणे केली जात आहे. येथील काही महत्त्वाच्या भागांची माहिती देणारे फलक  गायब आहेत. शनिवारवाड्याच्या बाहेर भिंतीजवळ कचरा टाकतात आणि कर्मचारी हे साफ देखील करत नाहीत. त्याऐवजी आतमध्ये परिसरातच कचरा जळला जातो." अशी माहिती आणि फोटो राजेंद्र कोद्रे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले.&

तसेच, उदय कुलकर्णी यांनी देखील याबाबत ''शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजावरील नक्षीकाम पुसट झाले आहे. तसेच 18 व्या शतकातील मराठा राज्यावर आधरित भित्तीचित्रांची देखील हिच स्थिती झालेली आहे.'' अशी माहिती आणि फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली. 
 
अशी झाली शनिवारवाड्याची दुरवस्था
- शनिवारवाड्याच्या बाहेरील भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे.
-  कचऱ्यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे. 
-  येथे साचलेल्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले आहे. 
- तसेच परिसरात बेवारस लोक कोठेही निवास करताना दिसतात
- माहिती फलकांवर धूऴ साचलेली आहे. 

Web Title: people reacting against bad condition of Shaniwarwada