esakal | दसऱ्याला सोने-चांदीची अपेक्षेपेक्षा जास्त विक्री; पुण्यातील सराफांनी केला दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Gold_Silver

पुणे शहरात 24 मार्चपासून सुमारे पाच महिने कडक लॉकडाऊन होते. त्यामुळे या कालावधीत अत्यावश्‍यक सेवा आणि जीवनोपयोगी वस्तूंच्या दुकानांचा अपवाद वगळता अन्य सर्व दुकाने बंद होती.

दसऱ्याला सोने-चांदीची अपेक्षेपेक्षा जास्त विक्री; पुण्यातील सराफांनी केला दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना संसर्गाचा परिणाम काही अंशी यंदा दसऱ्याला होणाऱ्या सोने-चांदी विक्रीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत सुमारे 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. यंदाच्या दसऱ्याला मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के सोन्याची विक्री होऊ शकली आहे. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर विक्रीची ही टक्केवारी अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.

'मुख्यमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवावे!'

पुणे शहरात 24 मार्चपासून सुमारे पाच महिने कडक लॉकडाऊन होते. त्यामुळे या कालावधीत अत्यावश्‍यक सेवा आणि जीवनोपयोगी वस्तूंच्या दुकानांचा अपवाद वगळता अन्य सर्व दुकाने बंद होती. व्यवसाय, खासगी कंपन्या, उद्योगधंदे ठप्प झाली होती. याचा परिणाम आर्थिक स्रोत कमी होण्यातही झाला आहे. त्यामुळे यंदा दसऱ्याला सोने-चांदीची विक्री पूर्वीप्रमाणे सुरळीत होणार की नाही, संशय व्यक्त करण्यात येत होता. याला सराफ व्यावसायिकही अपवाद नव्हते. कोरोनामुळे यंदा सोने-चांदीच्या विक्रीत सुमारे 50 टक्‍क्‍यांनी घट होईल, अशी शंका सराफ व्यावसायिकांना होती. प्रत्यक्षात त्याहून अधिक विक्री झाल्याचे समाधान असल्याचे रांका यांनी यावेळी स्पष्ट केले.

यंदा नवरात्रीत वाहन खरेदी घटली, पण चारचाकीची विक्री 'टॉप गिअर'मध्ये!​

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे दरवर्षी या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याकडे पुणेकरांचा कल असतो. यामुळे नेहमीच्या तुलनेत या दिवशी सोने-चांदीत अधिक विक्री होत असते. यंदा मात्र कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे यंदा सोने-चांदी बाजारावर नकारात्मक परिणाम होईल, अशी अटकळ बांधली जात होती.

पुण्यातील सराफ बाजार स्थिती
- पुणे शहरातील एकूण सराफ दुकाने - 1100.
- पिंपरी चिंचवडमधील दुकानांची संख्या - 600.
- ग्रामीण भागातील सराफ दुकाने - 2300.
- जिल्ह्यातील एकूण दुकाने - 4000

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image