यंदा नवरात्रीत वाहन खरेदी घटली, पण चारचाकीची विक्री 'टॉप गिअर'मध्ये!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत (17 ते 25 ऑक्टोबर) 6 हजार 454 वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 7 हजार 818 होती.

पुणे : कोरोनामुळे मंदावलेली वाहन व्यवसायातील उलाढाल आता पुन्हा सुरळीत होऊ लागल्याचे नवरात्रीनिमित्त झालेल्या वाहन खरेदीतून स्पष्ट झाले आहे. बाजारपेठेत आर्थिक मंदीचे वातावरण असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर चारचाकी वाहन खरेदीचा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. तर दुचाकीची मागणी कमी झाली आहे. मात्र, एकूण विक्रीचा विचार करता यावर्षी वाहन खरेदी कमी झाली आहे.

पुणे : उद्यानांबाबत महापौर मोहोळ यांचा मोठा निर्णय; वाचा काय म्हणाले महापौर​

घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत (17 ते 25 ऑक्टोबर) 6 हजार 454 वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 7 हजार 818 होती. यंदा आरटीओकडे 31 कोटी 97 लाख 78 हजार 668 रुपयांचा महसूल जमा झाला असून गेल्या वर्षी हा आकडा 30 कोटी 63 लाख 62 हजार 859 रुपये होता. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळीतील पाडवा या साडेतीन मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली जाते. मात्र, यंदा गुढीपाडवा, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोरोनामुळे वाहन विक्रीला फटका बसला होता. अनलॉकनंतर गेल्या काही महिन्यांपासून वाहनविक्री धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी वाढेल, अशी व्यावसायिकांना अपेक्षा होती. त्यासाठी खास ऑफर्सदेखील देण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी वाहन खरेदी 1 हजार 364 ने कमी झाली आहे.

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका​

प्रवासी वाहन खरेदीला खीळ :
कोरोना काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अनेक दिवस बंद होती. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या वाहनांना प्राधान्य दिले आहे. याकाळात टॅक्‍स, खासगी बस, ऑटोसारख्या वाहनांना होणारा प्रवास देखील कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी ऑटो, बस आणि टॅक्‍सीच्या खरेदी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वाहनांची यंदा पाच टक्के देखील खरेदी झालेली नाही.

वर्ष दुचाकी चारचाकी ऑटो अवजड वाहन टॅक्‍सी बस इतर एकूण
2019 4969 2000 321 297 161 36 34 7818
2020 3794 2338 43 218 8 3 50 6454

 अकरावी अॅडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन​

सध्या अनेक नोकरदारांचे घरून काम सुरू आहे. कॉलेज बंद असून कामगार वर्ग देखील त्यांच्या गावी गेला आहे. त्यामुळे दुचाकींची खरेदी कमी झाली आहे. मात्र चारचाकींची खरेदी वाढली असून त्यात बजेट गाड्यांची मागणी जास्त आहे. महागड्या गाड्यांची यावर्षी जास्त खरेदी झालेली नाही. कॅब सेवा बंद असल्याने टॅक्‍सींची खरेदी खूपच कमी झाली आहे.
- संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purchase of vehicles on the occasion of Dussehra has come down this year