पुणे : हडपसरमध्ये कायम स्वरूपी कोव्हीड रुग्णालय

गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्या हडपसर येथील आण्णासाहेब मगर रूग्णालयात कोरोनाबाधितांसाठी ५५ बेडचे रुग्णालय उभे केले आहे
Annasaheb Magar Hospital
Annasaheb Magar Hospitalsakal

पुणे : कोरोनाचे उपचार(Corona) घेण्यासाठी हडपसर (Hadapsar)परिसरातील नागरिकांना बाणेर, शिवाजीनगर येथील महापालिकेच्या दवाखान्यात दाखल व्हावे लागत होते. मात्र ही गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्या हडपसर येथील आण्णासाहेब मगर रूग्णालयात (Annasaheb Magar Hospital)कोरोनाबाधितांसाठी ५५ बेडचे रुग्णालय उभे केले आहे. यामध्ये लहान मुलांच्या एनआयसीयूसह मोठ्या व्यक्तींच्या आयसीयूचा (ICU)समावेश आहे. हडपसर भागतील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आण्णासाहेब मगर रुग्णालय सुरू करण्यात आले. तेथे सध्या ओपीडी आणि प्रस्तुतीगृह आहे.

Annasaheb Magar Hospital
सातारा : शिक्षकाने बनवली इलेक्ट्रॉनिक सायकल

महापालिकेने बाणेर येथे २५८ बेड क्षमतेचे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल उभारले आहे. गेल्या एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू झालेली असताना बाणेर येथील रुग्णालयावरच जास्त भार आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आण्णासाहेब मगर रुग्णालयात रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. तिसऱ्या लाटेतही या ठिकाणी क्वारंटाईन करण्यासाठी नियोजन केले जात आहे. कोरोनाच्या रुग्णांवर गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच लहान मुलांना कोरोना झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यास याठिकाणी उपचाराची सुविधा निर्माण केली आहे. त्यामुळे हडपसर व परिसरातील नागरिकांना बाणेर, शिवाजीनगर येथील रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही.

Annasaheb Magar Hospital
नवीन विद्यापीठ विधेयक मागे घ्यावे यासाठी युवा मोर्चा युवती विभागाचा निषेध

मगर रुग्णालयात आमदार निधीतून वैद्यकीय साधनसामुग्री घेण्यात आली आहे. सीएसआर फंडातून आॅक्सिजन प्लांटची बसविण्यात आला आहे. रुग्णालयात आयसीयू फिजिशियन, चार नर्स, चार मेडिकल आॅफिसर यांच्यासह २० वैद्यकीय कर्मचारी असा वैद्यकीय सेवक वर्ग नियुक्त करण्यात आला आहे.

"आण्णासाहेब मगर रूग्णालयात ओपीडी व प्रसुतीगृह या सुविधा आहेत. पण आता हे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल होणार आहे. या ठिकाणी ५५ बेड असून लहान मुलांसाठी १२ बेडचे एनआयसीयू व मोठ्या लोकांसाठी १२ बेडचे आयसीयू आहे. याठिकाणी महापालिकेचा निधी, आमदार निधी व सीएसआर मधून सुविधा निर्माण केल्या आहेत."

- डॉ. अंजली साबणे, सहाय्यक आरोग्य प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com