सातारा : शिक्षकाने बनवली इलेक्ट्रॉनिक सायकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : शिक्षकाने बनवली इलेक्ट्रॉनिक सायकल
सातारा : शिक्षकाने बनवली इलेक्ट्रॉनिक सायकल

सातारा : शिक्षकाने बनवली इलेक्ट्रॉनिक सायकल

सातारा : इंधन खर्चाचे आव्हान दिवसेंदिवस कठीण होत असताना जावळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाच्या संकल्पनेतून (concept of primary teacher) इलेक्ट्रॉनिक सायकल (electronic bicycle)आकारास आली आहे. अल्प खर्चातील ही पर्यावरणपूरक(Eco-friendly) सायकल सध्‍या सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरली आहे.

हेही वाचा: कुरुंदा येथे 'कोरोना' वाढल्याने आजपासून तीन दिवसाचा लॉकडाऊन

लक्ष्मण सीताराम जुनघरे हे या शिक्षकाचे नाव. ते मेढ्यालगत असलेल्या दिवदिववाडी गावचे रहिवासी. सध्या ते जांभुळवाडी (ता. जावळी) येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. आपल्या कल्पकतेच्या बळावर त्यांनी आजवर विविध संकल्पना सार्थ केल्या आहेत. खास करून स्वतः यांत्रिक अवजारांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये पेरणीयंत्र, कोळपणी यंत्र, ज्वारी काढणी यंत्र, भात मळणी यंत्र आदींचा समावेश आहे. व्यायामासाठीही त्यांनी वेगळी सायकल तयार केली आहे. अलीकडेच त्यांनी इलेक्ट्रॉनिक सायकलची निर्मिती केली आहे.(satara news)

हेही वाचा: लस न घेतलेले काहीजण म्हणतात..! मी मटन, अंडी खातो, मद्यपान करतो

मूळच्या सायकलीला त्यांनी बॅटरी जोडली आहे. ती वेळोवेळी चार्ज करता येते. एकदा बॅटरी चार्ज केली, की सायकल ५० किलोमीटर अंतर पार करू शकते. ताशी ३० ते ३५ किलोमीटर वेगाने ती धावू शकते. ही सायकल घेऊन श्री. जुनघरे शाळेत येतात. वाटेत ये-जा करणारेही सायकलीविषयी त्यांना विचारणा करतात. त्यांनाही ते मार्गदर्शन करतात.

सध्या इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. पर्यावरणाची समस्या चिंतेचा विषय बनत आहे. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक सायकल उपयुक्त ठरणारी आहे. व्यायामाच्या दृष्टीनेही तिला महत्त्व आहे.

-लक्ष्मण जुनघरे, प्राथमिक शिक्षक

Web Title: Teacher Made Electronic Cycle

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top