व्यक्तिमत्त्व विकासाचा घटक

सुजाता घोलप
शनिवार, 1 डिसेंबर 2018

कला हा केवळ छंद नसून, शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकासाबरोबरच भावनिक विकासासाठी महत्त्वाचा घटक आहे.

विद्यार्थ्यांच्या विकास प्रक्रियेतील अविभाज्य भाग असलेली कलानिर्मिती, मुलांचे विचार प्रभावीपणे व्यक्त करण्याची महत्त्वाची शक्ती आहे. गिरगटण्याने कलाविष्काराची सुरवात करणारी मुले अडीच ते तीन वर्षापासून पाचव्या-सहाव्या वर्षी आपले अनुभव, विचार, कल्पना आणि वास्तव यांचे अफलातून मिश्रण असलेले चित्रमय जग उभे करतात. ही त्यांची चित्रे त्यांचीच असतात. त्यांना चूक-बरोबर ठरवण्याचा अधिकार ते दुसऱ्या कुणाला देऊ इच्छित नसतात. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

आपला कलाविष्कार करण्यासाठी त्यांना कोणतीही अडचण येत नाही. मिळेल त्या माध्यमात ते स्वत-ला व्यक्त करतात. वाळूत, मातीत बोटाने रेखन करून, भिंतीवर खडू वापरून, पेन्सिल, पेन, स्केच पेनने कागदावर अत्यंत सहजतेने आणि ऊर्मीने काम करतात. त्यांच्या या निर्मितीला प्रौढांचे निकष आपण लावू शकत नाही. कारण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा एक वेगळाच कलाप्रकार वा कलाविष्कार असतो. मुलांच्या कार्यक्षमतेची वाढ होण्यासाठी ‘कलाशिक्षण’ आवश्‍यक असल्याचा दृष्टिकोन आता सर्वमान्य झाला आहे. त्यामुळेच चित्रकला शिकताना विद्यार्थ्यांच्या मनातील भावना, विचार, दैनंदिन जीवनातील अनुभव यांनाच महत्त्वाचे मानले पाहिजे.

चित्र रंगविताना...
     चित्राची निवड करणे (वयोगटानुसार)
     विषयाला अनुसरून चित्रांचे रेखांकन करणे.
     चित्र काढून झाल्यावर रंगाची निवड करणे.
     चित्र काढताना रेषा, आकार, रंग, छायाभेद, पोत या मूलभूत घटकांचा वापर चित्रात केल्यास सुंदर चित्र तयार होते. 

वयानुसार रंगांची निवड
     इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत - पेस्टल कलर (तेल खडू)
     इयत्ता पाचवी व सहावी - वॉटर कलर
     इयत्ता सातवी ते आठवी - पोस्टर कलर 

मी १९९३-९४मध्ये चौथी, पाचवीत असताना माजलगाव (जि. बीड) येथील केंद्रावर ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. माझी मुलगी आर्याने मागील वर्षी सिरसाळा (ता. परळी) येथील केंद्रावर स्पर्धेत सहभाग घेतला. यंदाही ती सहभागी होणार आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त असल्याचे मी अनुभवले आहे, आता मुलगीही तेच अनुभवीत आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेला ‘सकाळ’चा हा उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद आहे.
- वंदना जोशी, पालक, सिरसाळा (ता. परळी)

अधिक माहितीसाठी संपर्क
घनश्‍याम जाधव : ९८८१७१८८०४
संतोष कुडले : ९८८१०९८५०९
(सकाळी १० ते सायंकाळी ६)

Web Title: Personality development sakal drawing competition