
कोरोनो संसर्गाच्या कालावधीत नागरिकांकडुन विविध प्रकारच्या फळांना मागणी वाढली आहे विशेष करुन शरिरातील रोगप्रतिकारक्षमता वाढवणार्या " क " जीवनसत्व असणार्या फळांना मागणी वाढली आहे. त्यामध्ये पेरू या फळाला मागणी वाढली आहे.
पारगाव : कोरोनो संसर्गाच्या कालावधीत नागरिकांकडुन विविध प्रकारच्या फळांना मागणी वाढली आहे विशेष करुन शरिरातील रोगप्रतिकारक्षमता वाढवणार्या " क " जीवनसत्व असणार्या फळांना मागणी वाढली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात "क" जीवनसत्व असणार्या पेरुला चांगला बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांचा पेरुची लागवड करण्याकडे कल वाढला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनो विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिक शरिराची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी दैनंदिन आहारात 'क' जीवनसत्व असणार्या फळांचे सेवन करु लागले आहे त्यामुळे बाजारात भरपूर प्रमाणात 'क' जीवसत्व असणार्या लिंबू, आवळा, अननस, संत्री, मोसंबी, किवी व टोमॅटो या फळांना मोठी मागणी वाढली आहे. त्याच बरोबर प्रथिने भरपूर असणार्या अंडी, चिकन व मासे यांनाही या कालावधीत मागणी वाढली आहे.
विशेष करुन सर्वात स्वस्त व सहज उपलब्ध होणार्या पेरु फळांना जास्त मागणी वाढली आहे. त्यामुळे पेरुच्या बाजारभावातही वाढ झाली आहे. 60 ते 70 रुपये प्रती किलो वरुन पेरु आता 100 ते 120 रुपये प्रती किलोवर गेला असल्याचे पारगाव येथील फळांचे व्यापारी संतोष डोऴस यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड : ताथवडेतील रस्त्याचा डाव भाजपच्याच अंगलट
दिवसेंदिवस पेरुची वाढती मागणी लक्षात घेऊन जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील मारुती बढेकर यांनी तैवान पिंक जातीच्या पेरुची लागवड केली आहे. पेरुला चांगला बाजारभाव मिळत असल्याने पेरुची कीडीपासून संरक्षण करण्यासाठी बढेकर यांनी प्रत्येक पेरुच्या फळाला वरुन कागदी पिशवी बसवली आहे. त्यामुळे फळाचे किडीपासून संरक्षण तर होते शिवाय फळांना रंगही चांगला येतो. पेरुची दिवसेंदिवस वाढणारी मागणी लक्षात घेऊन अनेक शेतकर्यांनी नव्याने पेरुची लागवड केली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पेरु फळा मध्ये 'क' जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे शरिरातील रोगप्रतिकार क्षमता वाढते. पेरुमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) मोठ्या प्रमाणात असल्याने पेरुच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते त्यामुळे वजन कमी हेण्यास मदत होते.-श्वेता चिखले (आहार तज्ञ, मंचर)
(संपादन : सागर दिलीपराव शेलार)