पाळीव प्रेमींसाठी येत्या रविवारी ‘पेटगाला पेट शो’

भारतीय मांजरीबरोबरच पर्शियन, मेन कून, बंगाल कॅट यांसारख्या विविध जातीच्या मांजरी आणि अन्य पाळीव प्राण्यांचा अनोखा मेळावा पुण्यात भरविण्यात आला आहे.
Pet Show
Pet ShowSakal
Summary

भारतीय मांजरीबरोबरच पर्शियन, मेन कून, बंगाल कॅट यांसारख्या विविध जातीच्या मांजरी आणि अन्य पाळीव प्राण्यांचा अनोखा मेळावा पुण्यात भरविण्यात आला आहे.

पुणे - भारतीय मांजरीबरोबरच पर्शियन, मेन कून, बंगाल कॅट यांसारख्या विविध जातीच्या मांजरी आणि अन्य पाळीव प्राण्यांचा अनोखा मेळावा पुण्यात भरविण्यात आला आहे. होय, फेलाइन क्लब ऑफ इंडिया आणि मार्स पेटकेअर यांच्या वतीने येत्या रविवारी (ता. १३) ‘पेटगाला पेट शो’ डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) मैदानात आयोजित केला आहे.

प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात अनोखा ‘चॅम्पियनशिप कॅट शो’ पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. अॅलन रेमंड (ऑस्ट्रेलिया), जॅन रॉजर्स (यूएसए), फडली फुआद (इंडोनेशिया), इंद्रा लुबिस (इंडोनेशिया) हे ‘कॅट शो’चे परीक्षण करणार आहेत. यात दोनशेहून अधिक मांजरींचा सहभाग असेल, अशी माहिती फेलाइन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकिब पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाळीव प्राण्यांच्या मनोरंजनासाठी काही खास मज्जा मस्ती ही अनुभवायला मिळणार आहे. डॉग रनिंग गेम्स, पूल पार्टी, पेट फॅशन शो, इतर उपक्रम या मेळाव्यात असणार आहेत. त्याशिवाय मेळाव्यात पाळीव प्राणी दत्तक मोहीमही राबविली जाणार आहे. इच्छुकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून सकाळी दहा ते रात्री आठ यावेळेत असेल, असेही पठाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com