"साईप्रसाद प्रॉपर्टीज'विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

पुणे - विविध योजनांद्वारे करोडो रुपयांचा घोटाळा करून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या "साईप्रसाद प्रॉपर्टीज' विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका (रिटपिटिशन) दाखल करण्यात आली आहे. कंपनीमधील गुंतवणूकदारांनी मूळ कागदपत्रे कोणालाही देऊ नयेत, तसेच याचिकाकर्त्यांशी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन ऍड. मनोज नायक यांनी राज्यातील गुंतवणूकदारांना केले आहे.

वास्तू विकसन क्षेत्रातील साईप्रसाद उद्योग समूहाविरोधात प्रमोद चव्हाण, यतीन पालकर, प्रवीण भोंडवे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना नायक म्हणाले, ""याचिकेची सुनावणी पुढील महिन्यात होणार आहे. दरम्यान, कंपनीचे काही अधिकारी पैसे देण्याच्या बहाण्याने गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीशी संबंधित मूळ कागदपत्रे जमा करत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होऊन त्यांचे पैसे परत मिळण्यास मोठी अडचण निर्माण होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहावे.'' घोटाळ्याची चौकशी लवकरात लवकर व्हावी, यासाठी न्यायालयाने एक समिती नेमून त्याद्वारे पुढील कारवाई करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

Web Title: Petition against Saiprasad Properties in Supereme Court