पुणे-लोणावळा कॉरिडॉरविषयी उच्च न्यायालयात याचिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

अनेक दिवसांपासून प्रस्तावित असणाऱ्या पुणे ते लोणावळा लोकल कॉरिडॉरच्या कामाला विलंब होत असल्याने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय चिंचवड प्रवासी संघाने घेतला आहे. 

पिंपरी - अनेक दिवसांपासून प्रस्तावित असणाऱ्या पुणे ते लोणावळा लोकल कॉरिडॉरच्या कामाला विलंब होत असल्याने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय चिंचवड प्रवासी संघाने घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे ते लोणावळा दरम्यानच्या लोकल कॉरिडॉरमध्ये तिसरा आणि चौथा लोहमार्ग नव्याने टाकण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून, तो मान्यतेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे दिला आहे. या प्रकल्पासाठी ४३०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातील काही रक्‍कम राज्य सरकार आणि पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिका देणार आहे. मात्र, प्रत्यक्षात निधी उपलब्ध होत नाही. लोकल कॉरिडॉरचे काम होत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते, त्यामुळे प्रवासी संघाने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले  आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petition in high court about Pune-Lonavala corridor