पेट्रोल पंप ऑपरेटरने जोपासला अभिनय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 जानेवारी 2019

पिंपरी - शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन असो वा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित नाट्यछटा, त्यात तो अभिनय करायचा. मात्र, बारावीनंतर शिक्षण थांबले आणि पोटापाण्यासाठी पुणे गाठावे लागले. पेट्रोल पंपावर ऑपरेटरचे काम मिळाले. वैवाहिक जीवन सुरू झाले. या घटनेला आता २०-२५ वर्षे उलटली. मात्र, त्याच्यातील कलाकार अस्वस्थ करू लागला. त्यातून संधी मिळाली आणि पंपावरील काम सांभाळून तो अभिनयही करू लागला. आतापर्यंत पाच लघुपट आणि दोन चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. भाऊसाहेब गव्हाणे असे त्यांचे नाव. 

बीड जिल्ह्यातील तांबा राजोरी (जि. पाटोदा) मूळगाव असलेले भाऊसाहेब वीस वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. २००४ मध्ये पिंपरी- मोरवाडी येथील पेट्रोल पंपावर नोकरी मिळाली. पंपावरील सहकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या अभिनेत्यांप्रमाणे अभिनय करून, त्यांचा आवाज काढून सर्व जण हास्यविनोदात रमायचे. या माध्यमातून गव्हाणे यांनी आपल्यातील कलावंत जिवंत ठेवला आहे. त्यांची ओळख निर्माता, दिग्दर्शक शिवा बागूल यांच्याशी झाली. त्यांच्या माध्यमातून २०१५ मध्ये एका चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली. त्यातील अभिनय पाहून बागूल यांनी गव्हाणे यांना आगामी ‘सण १९८१’ चित्रपटांत मुख्य अभिनयासह निर्मिती व्यवस्थापकाची जबाबदारी सोपवली.

माझ्यातील अभिनय जिवंत ठेवण्यासाठी पंपावरील सहकारी, मालक व व्यवस्थापकांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे. मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. 
- भाऊसाहेब गव्हाणे, अभिनेता व पेट्रोल पंप कर्मचारी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Pump Operator Actor Motivation