esakal | पेट्रोलियम कंपनी म्हणतेय, 'गॅस सिलिंडरचे अनुदान सुरूच!'
sakal

बोलून बातमी शोधा

Gas

केंद्र सरकारने गेल्या जून महिन्यापासून घरगुती स्वयंपाक गॅस सिलिंडरची किंमत 597 रुपयांपर्यंत खाली आणली आहे. 

पेट्रोलियम कंपनी म्हणतेय, 'गॅस सिलिंडरचे अनुदान सुरूच!'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनुदानित आणि विना अनुदानित स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किमतीमध्ये जादा तफावत नसल्यामुळे अनुदानाची रक्‍कम संबंधित ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा होत नाही. परंतु पेट्रोलियम कंपन्यांकडून अनुदान बंद करण्यात आलेले नाही. गॅस सिलिंडरचा दर वाढल्यास पुन्हा अनुदानाची रक्‍कम बॅंक खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियम कंपनीकडून देण्यात आली.

Nikita Tomar murder: तौसिफला पिस्तूल देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या​ 

केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात. देशातील इंधनाचे उत्पादन, त्याचे आंतरराष्ट्रीय दर, आयात या घटकांमुळे एलपीजी गॅसचा दर सतत बदलत असतो. सुमारे आठशे रुपयांच्या गॅस सिलिंडरचे जवळपास दोनशे रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या आधारकार्डला जोडलेल्या बॅंक खात्यात जमा व्हायचे. मात्र, केंद्र सरकारने गेल्या जून महिन्यापासून घरगुती स्वयंपाक गॅस सिलिंडरची किंमत 597 रुपयांपर्यंत खाली आणली आहे. 

यावर्षी पुण्यातील बागेत ‘दिवाळी पहाट’ नाहीच; महापौर मुरलीधर मोहोळ​

सध्या पुणे शहर आणि जिल्ह्यात अनुदानित स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किंमत 571 रुपये, तर विना अनुदानित सिंलिंडरची किंमत 597 रुपये आहे. अनुदानित सिलिंडर विना अनुदानित सिलिंडरमध्ये केवळ 26 रुपयांची तफावत आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे अनुदान बॅंक खात्यात जमा होत नाही, असे गॅस वितरकांकडून सांगण्यात आले. 

पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलिंडरच्या अनुदानाची रक्‍कम बॅंक खात्यात बंद करण्यात आलेले नाही. गॅस सिलिंडरचे अनुदान हे सुरूच आहे. 
- अंजली भावे, महाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन), इंडियन ऑईल

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top