Nikita Tomar murder: तौसिफला पिस्तूल देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वृत्तसंस्था
Thursday, 29 October 2020

निकिता खून प्रकरणातील मुख्य आरोपी तौसिफची दोन दिवसांची कोठडी संपल्यानंतर एसआयटीने त्याला गुरुवारी (ता.२९) न्यायालयात हजर केले, तेथून त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Nikita Tomar Murder Case: फरिदाबाद : निकिता तोमच्या कुटुंबियांना फरिदाबाद पोलिसांनी सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. निकिताच्या हत्येप्रकरणाशी संबंधित सर्व महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी गोळा केले आहेत, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने गुरुवारी (ता.२९) दिली. बी.कॉम.च्या अंतिम वर्षामध्ये शिकणाऱ्या निकिता तोमरला गेल्या सोमवारी महाविद्यालयाबाहेर एका मुस्लीम युवकाने गोळ्या घालून ठार केले होते. 

पुण्यात पुन्हा नवजात अर्भक सापडलले कचरा कुंडीत!​

निकिताचा भाऊ, वडील आणि आई यांना स्वतंत्र गनमॅन देण्यात आले असून त्यांच्या संरक्षणासाठी २४ तास तैनात राहणार आहेत. निकिताच्या हत्येप्रकरणी १२ दिवसांत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खटल्याशी संबंधित सर्व पुरावे गोळा करण्यात आले असून फक्त दोषारोपपत्र तयार करणे आणि ते कोर्टात सादर करणे बाकी असल्याचेही पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले. 

या हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री अझरुद्दीनला पोलिसांनी नूह येथून ताब्यात घेतले आहे. अझरुद्दीनने हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या तौसिफला शस्त्रे पुरवली आहेत. अझरुद्दीनवर तौसिफला देशी बनावटीची पिस्तूल पुरविल्याचा आरोप आहे. 

फ्रान्स : दहशतवादी हल्ल्यात तिघांचा मृत्यू; हल्लेखोराने दिले 'अल्ला हो अकबर'चे नारे!​

निकिता खून प्रकरणातील मुख्य आरोपी तौसिफची दोन दिवसांची कोठडी संपल्यानंतर एसआयटीने त्याला गुरुवारी (ता.२९) न्यायालयात हजर केले, तेथून त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तौसिफचा जोडीदार रेहानची रिमांड उद्या पूर्ण होणार त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, बल्लभगढ येथील अग्रवाल कॉलेजसमोर 'वुमन पॉवर' स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा विचार करून त्यांनी राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात महिला कक्ष स्थापन करण्याची तसेच प्रत्येक महाविद्यालयात महिला पोलिस तैनात करण्याची मागणी केली आहे.

चिडलेल्या युट्यूबरने अडीच कोटींची मर्सिडीज दिली पेटवून; VIDEO VIRAL​

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (एबीव्हीपी) विद्यार्थी प्रतिनिधी निकिता तोमरला न्याय मिळावा, या मागणीसाठी अग्रवाल महाविद्यालयाबाहेर अनेक विद्यार्थ्यांनी धरणे धरले आहे. ते म्हणाले की, महाविद्यालयात कोणतीही घटना घडल्यास त्यास महाविद्यालय प्रशासन जबाबदार असेल. तसेच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि महाविद्यालयाबाहेर पीसीआर करावे. बुधवारी रात्री पोलिसांनी निषेध करणार्‍या विद्यार्थ्यांचे तंबू हटवले मात्र, तरीही विद्यार्थी संपूर्ण रात्र त्याठिकाणी बसून राहिले होते.

करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल अम्मू, माजी आमदार शारदा राठोड, उमेश ठाकूर यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली आणि सरकार, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच निकिताच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Faridabad Police provided security to Nikita Tomars family