Fight With Corona : कोरोनाग्रस्तांना औषधांचा डोस देतायेत फार्मासिस्ट कल्पेश घोलप
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी फक्त वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणे पुरेसे नाही. या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीला आणखी काही कर्मचाऱ्यांचे पाठबळही असावे लागते. या पाठबळ असणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने परिचारिका (नर्स), आरोग्यसेवक (ब्रदर), रुग्णांवरील उपचारासाठी डॉक्टरांना वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देणारे कर्मचारी, फार्मासिस्ट (औषध निर्माण अधिकारी) आदींचाही मोठा वाटा असतो. यानुसार कोरोना रुग्णांना वेळीच आणि पुरेशी गोळ्या-औषधे पुरविण्याचे काम फार्माशिष्ट कल्पेश घोलप करत आहेत.
पुणे शहरातील सिंहगड रोडवरील वडगाव धायरी येथील महापालिकेच्या (स्व.) मुरलीधर लायगुडे रुग्णालयात घोलप हे एकमेव औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या रुग्णालयात सध्या सुमारे ४० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याच्या जोडीलाच येथे कोवीड केअर सेंटरसुद्धा सुरु करण्यात आलेले आहे. येथे घोलप हे एकमेव फार्मासिस्ट असल्याने त्यांना प्रशासकीय व्यवस्थापन (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क), वैद्यकीय अधिकाऱ्यांना वैद्यकीय उपकरणे, सुरक्षेसाठीच्या मेडिकल अॅसेशिरिजा पुरवठा करणे, (वैद्यकीय साहित्य) आणि रुग्णांना गोळ्या-औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे काम करावे लागत आहे. यामुळे येथे घोलप हे सध्या आई आणि दाई अशा दुहेरी भूमिकेत काम करत आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोना रुग्णांवरील उपचार म्हटलं की, फक्त सर्दी, ताप आणि खोकल्याची औषधे देण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. याच्या जोडीलाच कोणाला मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, कर्करोग, किडनी, न्युमोनिया यासारखे आजारही असतात. अशा दुर्धर आजारांवरील औषधे प्रसंगी बाहेरून आणावी लागतात. वेळीच ते उपलब्ध करून देण्याचे काम घोलप करत आहेत.
घोलप हे मुळचे पुणे जिल्ह्यातील घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील आहेत. ते वृद्ध आई ज्योती घोलप आणि दोन भावांसह एकत्र कुटुंबात राहतात. पत्नी मनिषा या समाजसेविका आहेत. त्या हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे निराधार वृद्धांसाठी वृद्धाश्रम चालवतात. घोलप यांनी भारती विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी (बीएस्सी) आणि त्यानंतर योगविद्येचा पदविका व औषध निर्माणशास्त्र विषयातील पदविका अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. गेल्या चार वर्षांपासून ते लायगुडे रुग्णालयात कार्यरत असून, त्याआधी त्यांनी कमला नेहरू रुग्णालयात काम केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.