‘फार्मसी’ प्रवेशासाठी १९ जूनची मुदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - राज्यातील महाविद्यालयांमध्ये बी-फार्म व फार्म-डी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १९ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. प्रवेशासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी २० जूनला जाहीर होणार आहे. तसेच, महाविद्यालये १ ऑगस्टपासून सुरू होतील, अशी माहिती राज्य सीईटी सेलने दिली आहे.

पुणे - राज्यातील महाविद्यालयांमध्ये बी-फार्म व फार्म-डी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १९ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. प्रवेशासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी २० जूनला जाहीर होणार आहे. तसेच, महाविद्यालये १ ऑगस्टपासून सुरू होतील, अशी माहिती राज्य सीईटी सेलने दिली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) आणि नीट परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे. या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील. या प्रवेशासाठी बारावीत ‘पीसीबी’ गटात सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के गुण, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळणे गरजेचे आहे. याबाबत https://ph२०१८.mahacet.org या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक  
 ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत : १९ जूनपर्यंत
 कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्‍चिती :  १९ जूनपर्यंत
 प्राथमिक (प्रोव्हिजनल) गुणवत्ता यादी जाहीर : २० जून
 गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे : २१ आणि २२ जून
 अंतिम प्राथमिक गुणवत्ता यादी : २३ जून
 रिक्त जागांची माहिती देणे : 
२३ जून
 महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : २४ ते २७ जून
पहिली फेरी
 प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर : २८ जून
 गुणवत्ता यादीनुसार प्रवेश : 
२९ जून ते २ जुलै
 दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर : ३ जुलै
 महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : ४ ते ६ जुलै

दुसरी फेरी
 प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर : ७ जुलै
 गुणवत्ता यादीनुसार प्रवेश : 
८ ते १० जुलै
 तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर : ११ जुलै
 महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : १२ ते १४ जुलै
तिसरी फेरी
 प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर : १५ जुलै
 गुणवत्ता यादीनुसार प्रवेश : 
१६ ते १८ जुलै
 महाविद्यालयात जाऊन प्रवेश : २९ जून ते २० जुलै
 रिक्त जागा जाहीर : २ ऑगस्ट
 महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : ३ ते ५ ऑगस्ट
 प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर (सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांसाठी फक्त) : 
६ ऑगस्ट
 महाविद्यालयांमध्ये जाऊन 
प्रवेश निश्‍चित करणे : 
७ ते ९ ऑगस्ट

 प्रवेशाचा कट ऑफ : १४ ऑगस्ट

Web Title: pharmacy admission education online form