औषधनिर्माणशास्त्रातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्या : फार्मसी कौन्सिलची सुचना

Pharmacy Council Suggest about Pharmacology students enroll to the next class
Pharmacy Council Suggest about Pharmacology students enroll to the next class
Updated on

पुणे : औषधनिर्माणशास्त्रातील पदविका, पदवी आणि पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, अशी शिफारस फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (औषधनिर्माणशास्त्र परिषद) केली आहे. विद्यापीठांनी परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि आता परीक्षा घेणे शक्य नसल्यास पुढील सत्रात परीक्षा घ्यावी, असे परिषदेने सुचविले आहे.


देशभरात जवळपास चार हजारांहुन अधिक औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये असून त्यातून सुमारे चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर राज्यात औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाची २८५ तर, पदवी अभ्यासक्रमाची १७० महाविद्यालये आहेत.
परीक्षा वेळेवर न झाल्यास निकाल आणि पुढील प्रवेश प्रकियेवर परिणाम होईल. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या यंदाच्या परीक्षा घेण्यापूर्वीच त्यांना पुढील वर्षांत प्रवेश देण्यात यावा, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

 Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असली, तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि त्यांचा शिकण्यासाठीचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी शिक्षण संस्थांनी सर्वोतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे.औषधनिर्माणशास्त्रातील डी. फार्म, बी. फार्म, एम.फार्म, फॉर्म.डी आणि बी.फार्मसी यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्ययनाचे कार्य सूरू ठेवावे, असे परिषदेने नमूद केले आहे.

   खासदार, आमदारांच्या ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्या ! 
औषधनिर्माणशास्त्र परिषद ही अभ्यासक्रमाचे नियमन करणारी यंत्रणा असली तरी परीक्षा घेण्याचे अधिकार हे विद्यापीठांचे असणार आहेत. त्यामुळे परिषदेने शिफारशी केल्या असल्या तरी परीक्षा घेण्याचे  अधिकार हे विद्यापीठांना किंवा शिक्षणसंस्थांना आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय हा विद्यापीठांचाच असणार आहे.


औषधनिर्माणशास्त्र परिषदेतर्फे करण्यात आलेल्या सूचना : 
- अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधी सर्व सत्रांतील सर्व विषयांच्या परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक
- कोणतीही परीक्षा रद्द झालेली नाही, तर या परीक्षा पुढील सत्रात घेण्याची मुभा
- उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये बदल नाही.
- या शिफारशी केवळ सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीपुरत्या मर्यादित

" औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा या कालावधीत घेता येत नसतील तर विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश द्यावा आणि सर्व व्यवहार पूर्ववत झाल्यानंतर पुढील वर्षी योग्य त्या वेळी एप्रिल-मे 2020 च्या परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. एम.फार्म च्या संशोधकीय कामाचे परीक्षण ऑनलाइन पद्धतीने ठरल्याप्रमाणे करावे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पावले उचलावित, असे परिषदेने कळवले आहे."
- डॉ. आत्माराम पवार, सदस्य, अभ्यास मंडळ, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com