पुणे विद्यापीठात संशोधनामध्ये ‘भौतिकशास्त्र’ आघाडीवर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधनामध्ये भौतिकशास्त्र विभाग आघाडीवर असून, आजवर विभागाने दोन हजार ३६६ शोधनिबंध प्रकाशित केले आहे.
Pune University
Pune UniversitySakal

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Pune University) संशोधनामध्ये भौतिकशास्त्र विभाग (Physics Department) आघाडीवर असून, आजवर विभागाने दोन हजार ३६६ शोधनिबंध प्रकाशित केले आहे. तर एक हजार ९०१ शोधनिबंध प्रकाशित करणारा रसायनशास्त्र विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यापीठाने एकूण पाच हजार ३७४ शोधनिबंध प्रकाशित केले आहे.

विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे स्पष्ट झाले आहे. येथील विभागांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच संशोधनाची दीर्घ परंपरा आहे. भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. संदेश जाडकर म्हणले, ‘‘पदव्युत्तर शिक्षणासाठी विभागात आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संशोधनात सहभाग वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. विभागाला संशोधनाची दीर्घ परंपरा असून, त्यामुळे शोधनिबंधांची संख्याही सर्वाधिक आहे.’’ विद्यापीठातील कला आणि वाणिज्य विद्याशाखांच्या तुलनेत विज्ञान शाखांमधील विभागांमध्ये शोधनिबंधांची संख्या जास्त आहे.

Pune University
येरवडा, नगर रस्ता भागात मोठी अतिक्रमण कारवाई; चौदा ट्रक माल जप्त

नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये संसाधनांची कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला आहे. भारतासारख्या देशात शैक्षणिक इमारतींबरोबरच उद्योगांचा सहभाग, परस्पर सहकार्य करार, तज्ज्ञांशी असलेला संवाद आदी गोष्टीही महत्त्वपूर्ण संसाधने आहेत. यांची कार्यक्षमता संकुल पद्धतीमुळे (स्कूल सिस्टम) वाढणार आहे, असे मत प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,‘‘कार्यक्षम संसाधनांच्या उपयोगातून संशोधनाबरोबच नवसंकल्पना, स्टार्टअप्स आदींनाही फायदा होतो. गुणवत्तेसाठी आग्रही (क्वालिटी कॉन्सियस) होण्यासाठी खर्चाच्या बाबतीत जागृत राहणे (कॉस्ट कॉन्शियस) गरजेचे आहे. सर्वांना परवडणारे शिक्षण व्हावे म्हणून शैक्षणिक खर्चाच्या बाबतीत संवेदनशीलता हवी. संकुल पद्धतीतून याला चालना मिळते.

शोधनिबंधांच्या आकडेवारीचे निष्कर्ष

  • विद्यापीठातील निम्म्याहून जास्त शोधनिबंध विज्ञान विद्याशाखेतील

  • संशोधन परिषदांची संख्याही विज्ञान विद्याशाखेत सर्वाधिक

  • संशोधनाची परंपरा आणि संशोधन अर्थसहाय्यांचा विभागांना फायदा

  • आंतरविद्याशाखीय विभाग, अभ्यास मंडळांच्या संशोधनात वाढ

Pune University
पुण्यात UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी 'फाईव्ह स्टार' अभ्यास केंद्र

शोधनिबंधांची आकडेवारी

१) आघाडीचे पहिले पाच विभाग

विभाग शोधनिबंध संशोधन परिषदा

भौतिकशास्त्र २३६६ २६४

रसायनशास्त्र १९०१ १२२

वनस्पतीशास्त्रज्ञ ६७६ ८

प्राणिशास्त्र ४४१ १

भूशास्त्र ३४० १३

२) इतर निवडक विभागांमधील शोधनिबंध

मराठी १२९ ८

व्यवस्थापनशास्त्र १४२ २४

संस्कृत १८२ ४७

तंत्रज्ञान विभाग २४ १७

पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांनी पाचपेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित करावे, यासाठी आम्ही आग्रही असतो. अद्ययावत आणि महत्त्वपूर्ण विषयांवर विभागामध्ये संशोधन केले जात असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाच्या आधारे स्वदेशी संशोधनाची दिशा निश्चित करण्यासाठी विभाग प्रयत्नशील असतो.

- डॉ. संदेश जाडकर, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग

सर्वात जुन्या असलेल्या भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विभागांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांशी घनिष्ठ संबंध आहे. तसेच संशोधनाला आर्थिक साहाय्य देणाऱ्या संस्थांचे सहकार्य त्यांना लाभते. संशोधन परंपरा आणि उद्योगांचा सहभागामुळे या विभागांमध्ये संशोधन जास्त दिसते. याचा अर्थ इतर विभाग कमी पडले असाही होत नाही.

- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com