बारामती : १ हजार कामगारांना पियाजिओचा आधार; सीएसआर उपक्रमांतर्गत धान्यवाटप!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

बारामतीमधील सरकारी रुग्णालयात विलगीकरण कक्षााठी ईसीजी मशीन, पल्स ऑक्सीमीटर असे साहित्य देण्यात येणार आहे.

पुणे : पियाजिओ व्हेईकल्‍स या इटालियन कंपनीतर्फे औद्योगिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत बारामतीमधील सुमारे एक हजार कामगारांना महिनाभराचे धान्य मोफत देण्यात आले.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बारामती औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना यामुळे दिलासा मिळाला. या कंपनीने 'न्‍यू व्हिजन' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पुण्‍यातील स्‍थलांतरित बांधकाम कामगारांना धान्यवाटप केले. याशिवाय युनायटेड वे मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ससून रुग्णालयात पीपीइ कीटचेही वाटप करण्यात आले. 

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाची बारामतीला भेट; वाचा काय घडलं?

बारामतीमधील सरकारी रुग्णालयात विलगीकरण कक्षााठी ईसीजी मशीन, पल्स ऑक्सीमीटर असे साहित्य देण्यात येईल, अशी माहिती 
पियाजिओ व्हेईकल्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डिएगो ग्राफी यांनी दिली. 

- 'दूध हळद प्यायला लोकांना प्रोत्साहन द्या'; दूध संघाचं राज्य सरकारला आवाहन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Piaggio company distributed grain under CSR activity to workers in Baramati