डॉ. श्रीराम लागू यांना यंदाचा ‘पिफ’ समर्पित

Pune-International-Film-Festival
Pune-International-Film-Festival

दिग्दर्शक सिंग, उषा खन्ना, विक्रम गोखले यांना विशेष पुरस्कार
पुणे - हिंदी मालिकांचे दिग्दर्शक बी. पी. सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पिफ डिस्टिंग्विश्‍ड ॲवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक ॲण्ड साउंड’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 

महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक हंसध्वज सोनावणे, एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनचे सहयोगी संचालक प्रो. अमित त्यागी या वेळी उपस्थित होते.

यंदाचा हा महोत्सव दिवंगत अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात येणार असून, महोत्सवाच्या प्रमुख प्रवेशद्वारास डॉ. लागू यांचे नाव देण्यात येणार आहे, तसेच लागू यांचे काही निवडक चित्रपटदेखील महोत्सवात पाहायला मिळतील.

‘पिफ’मधील मराठी स्पर्धात्मक चित्रपटांच्या नावांची घोषणाही आज करण्यात आली. त्यातून निवड झालेले मराठी चित्रपट पुढीलप्रमाणे : ‘तुझ्या आईला’ (शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते), ‘चिवटी’, ‘वाय’, ‘फोटो प्रेम’, ‘स्माईल प्लीज’, ‘बोन्साई’, ‘आनंदी गोपाळ’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com