
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चार ते अकरा मार्च दरम्यान होणार असल्याची घोषणा पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या वेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कला दिग्दर्शक समर नखाते व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम उपस्थित होते.
पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चार ते अकरा मार्च दरम्यान होणार असल्याची घोषणा पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या वेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कला दिग्दर्शक समर नखाते व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम उपस्थित होते.
पटेल यांनी सांगितले की, महोत्सवाचे हे १९ वे वर्ष असून, मागील नऊ महिन्यांत कोरोनामुळे अनिश्चितता व भीतीचे वातावरण होते. या परिस्थितीत जबाबदारी निभावणाऱ्या आघाडीच्या कोरोना योद्ध्यांना हा महोत्सव समर्पित असेल. पुणे, मुंबई, नागपूर पाठोपाठ आता लातूर हे नवे केंद्र महोत्सवात जोडले जात आहे. शासनाकडून या महोत्सवासाठी चार कोटी रुपयांचे अनुदान मंजूर होते, पण महोत्सव आयोजकांनी अडीच कोटी रुपयेच अनुदान द्यावे, अशी विनंती स्वत:हून सरकारकडे केली, ती सरकारने मान्य केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गुप्ता यांनी स्पष्ट केले की, यंदाचा महोत्सव ऑनलाइन व प्रत्यक्ष चित्रपटगृहात होईल. ऑनलाइन माध्यमातून जगभराचे प्रेक्षक यात जोडले जाण्याची अपेक्षा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी नियम पाळत आयोजन केले जाईल. चित्रपट ही सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत लोकप्रिय कला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यात मोठ्या प्रमाणात झाला असला तरी येथेच पुन्हा आनंद देणाऱ्या चित्रपटांची पर्वणी मिळणार आहे.
खंडणी मागत व्यावसायिकांना केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
१८० चित्रपटांची मेजवानी
यंदाच्या महोत्सवासाठी ९३ देशांमधून १६११ चित्रपट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी समितीने अंतिम निवड केलेल्या १८० चित्रपटांचा आस्वाद चित्रपटरसिकांना या महोत्सवात घेता येईल, अशी माहिती समर नखाते यांनी दिली.
Edited By - Prashant Patil