कोयत्याचा हवेतील वार हवेत झेलला नाहीतर....

Sagar-Hivarkar
Sagar-Hivarkar

लोणी काळभोर (पुणे) - निर्मनुष्य रस्त्यावर एका पतसंस्थेचा पिग्मी एजंट एकटाच जात असल्याची संधी साधुन, तिन अनोळखी तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवुन, एंजट जवळची पैशाची बॅग जबरीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र एंजटने समय सुचकता दाखवत कोयता हवेतल्या हवेत चोरट्याच्या हातुन हिसकाऊन घेतल्याने, चोरट्यांनाच हातात आलेली बॅग सोडुन धुम ठोकावी लागल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथे घडली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सागर मधुकर हिवरकर (वय ४०, रा. शिवसागर हाईटस, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हे त्या पिग्मी एंजटचे नाव असुन, वरील घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रांहीजवस्ती रस्त्यावर शनिवारी (ता. १) सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास घडली. दरम्यान सागर हिवरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हिवरकर हे हडपसर येथील जनहित नागरी सहकारी पंतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून मागिल २० वर्षापासुन काम करतात. शुक्रवारी (ता. ३०) दिवसभर जमा केलेली पिग्मीची रक्कमेसह राहिंजवस्ती परीसरात शनिवारी सकाळी जमा झालेली रक्कम घेऊन, सागर हिवरकर शनिवार सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास मोटार सायकलवरुन हडपसरला निघाले होते. सागर हिवकर राहिंजवस्ती रस्त्यावर एमआयटी शिक्षण संस्थेच्या दोन नंबर गेट जवळ आले असता, गेटजवळ अगोदरच पासुन मोटीर सायकलवर थांबलेल्या तीन  सागर हिवरकर यांना थांबवुन राहिंज वस्तीमधील एका व्यक्तीचा पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. सागर मोटारसायकल थांबवुन पत्ता सांगत असतानाच, तिघापैकी एकाने सागर यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या तरुनाने सागर यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र सागर हिवरकर यांनी कोयत्याचा हवेतील वार हवेत झेलुन चोरट्याकडुन कोयता ओढुन घेतला. 

चोरट्यांच्या हातुन कोयता सागर हिवरकर यांच्या हातात येताच, सागर यांनीच चोरट्यांच्यावर वार करण्याची एक्टींग केली. कोयत्याने वार करण्याची एक्टींग पाहुन, तीनही तरुणांनी मोटारसायकलवरुन पळ काढला. या झटापटीत सागर यांच्या हातावर कोयत्याचा हलकासा फटका बसला. यात सागर यांना जखम झाली नसली तरी, त्यांचा शर्ट मात्र फाटला. दरम्यान हल्ला करणारे आरोपी पळुन जाताच, सागर हिवरकर यांनी लोणी काळभोर पोलिसात धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com