पुणे - हडपसरमध्ये शिवसेनेचे डुकरे सोडून आंदोलन

संदिप जगदाळे
सोमवार, 28 मे 2018

हडपसर (पुणे) : प्रभाग क्र. 26 मधील मोकाट डुकरांवर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयात डुकरे सोडून आंदोलन केले. तसेच नगरसवेक नाना भानगिरे यांनी प्रभागातील अतिक्रमणे हटवावीत, नियमीत पाणी पुरवठा करावा, नियमित कचरा उचलावा या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. उपअभियंता दिलीप पावरा यांनी निवेदन स्विकारले व प्रश्न मार्गी लावण्याचे अश्वासन दिले, मात्र प्रश्न मार्गी लावल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा इशारा भानगिरे यांनी दिला. 

भानगिरे म्हणाले, मंहमदवाडी- कौसरबाग हा प्रभाग लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टिने मोठा प्रभाग आहे. चिंतामणीनगर, गुलामआली नगर, ससाणे वस्ती, काळेपडळ, बडदे मळा, दुगड चाळ, हाडेवाडी रोड, ईसीपी वास्तू, ड्रीम इस्टेट, ग्रीन सिटी, नमो विहार, ऊशरथ बाग, सिध्दार्थनगर, पांगारे मळा, साळुंके विहार, भीमनगर या भागात अनियमीत व अपु-या दाबाने पाणी पुरवठा होता. मोकाट डुकरांमुळे अपघात व रोगराई वाढली आहे. हांडेवाडी रस्ता नो हॅाकर्स झोन असूनही तेथील बेकारयेदेशीर अतिक्रमणे हटवली नाहीत. प्रभागातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देवून ही प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे. 

याप्रसंगी अभिजीत बाबर, संतोष जाध, व्रक्रम फुकटे, विशाल वाल्हेकर, आशिष अल्हाट, धर्मराज म्हेत्रे, विकास भुजबळ, योगेश सातव उपस्थित होते. 

Web Title: pigs put in municipal corporation assistant commissioners office in hadapsar