पुणे : मूळव्याधग्रस्तांचा मेळावा; होणार इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये नोंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

मूळव्याधग्रस्त रुग्णांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, हा उद्देश ठेवून मूळव्याधग्रस्त रुग्णांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता. 26) सायंकाळी इस्कॉन मंदिरात करण्यात आले आहे. या मेळाव्यात मूळव्याधग्रस्त रुग्ण सहभागी होणार असून, या मेळाव्याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये होईल, अशी माहिती मूळव्याध तज्ज्ञ डॉ. कुणाल कामठे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे : मूळव्याधग्रस्त रुग्णांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, हा उद्देश ठेवून मूळव्याधग्रस्त रुग्णांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता. 26) सायंकाळी इस्कॉन मंदिरात करण्यात आले आहे. या मेळाव्यात मूळव्याधग्रस्त रुग्ण सहभागी होणार असून, या मेळाव्याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये होईल, अशी माहिती मूळव्याध तज्ज्ञ डॉ. कुणाल कामठे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या कार्यक्रमात सायंकाळी 5.30 वाजता सुश्रूत पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. डॉ. के.के. सिजोरिया (ग्वाल्हेर), डॉ. महेश संघवी (मुंबई), डॉ. नंदकिशोर बोरसे (पुणे), वैद्य अश्‍विन बरोत (लंडन) यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, डॉ. आलोक गुप्ता, डॉ. भरत ओझा यांना एक्‍स्ट्राऑर्डिनरी वर्क इन प्रोक्‍टोलॉजी या पुरस्काराने तर, डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. वीणा देव, डॉ. हरिष पाटणकर यांना आयुर्वेद आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

या कार्यक्रमास इस्कॉनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णनामदास महाराज, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, खासदार अमर साबळे आदी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस डॉ. सीमा पाटोळे, डॉ. अमित मनुरे, डॉ. अभिजित जगदाळे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: piles peoples rally will be recorded in International Book of Record