पिंपरीत 14 आरोपींना अटक ; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

In pimpri 14 accused arrested 14 lakhs seized
In pimpri 14 accused arrested 14 lakhs seized

पिंपरी : जबरी चोरी, साखळी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या 14 आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी, मोटार, मोबाईल, घड्याळ, गावठी कट्टा, देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे, असा 14 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिस अप्पर आयुक्त मकरंद रानडे यांनी शुक्रवारी (ता. 7) पत्रकार परिषदेत दिली. 

परिमंडळ एकच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे आदी उपस्थित होते. मंगळवारी (ता. 4) पिंपरीतील रमाबाईनगर येथे पुलावरून जाताना भरत सुरेश जैन (वय 26) यांना मारहाण करून त्यांच्या दुचाकीतील एक लाख 75 हजारांची रोकड व दुचाकी दोन अज्ञातांनी पळवून नेली.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आयुब नजीर शेख (वय 23, रा. शितलानगर, देहूरोड), मस्तान अहमद कुरेशी (वय 23, रा. राजीव गांधीनगर, देहूरोड) यांना आकुर्डीतील खंडोबामाळ रस्त्यावर ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्यांनी दहा जणांनी मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानुसार सलमान मेहबूब शेख (वय 22), रफीक अब्दुल शेख (वय 19), सिद्दीक आताकुररेहमान शेख (वय 23, सर्व रा. आंबेडकरनगर, देहूरोड), नियाज जमीर शेख (वय 21, थॉमस कॉलनी, देहूरोड) नवशाज नजीर शेख (वय 20, रा. राजीव गांधीनगर, देहूरोड) यांना अटक केली. पाच जबरी चोरीचे गुन्हे उघड झाले असून, पाच लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

अल्ताफ बबलू रंगरेज, साबीर समीर शेख (वय 19) व लाला ऊर्फ अताहुल्ला सिकंदर शेख (सर्व रा. देहूरोड) हे पळून गेले आहेत. 
दुसऱ्या कारवाईत विकास सुनील घोडके (वय 21, रा. गणेशनगर, वडगाव शेरी), कुलदीप तानाजी शिंदे (वय 20, रा. गणेशनगर, चंदननगर) आणि अजय सतीश दुशिंग (वय 20, रा. घरकुल बी-16, चिखली) यांना अटक केली. त्यांच्याकडून मन्नपुरम गोल्ड फायनान्समध्ये ठेवलेले 20 तोळे सोन्याचे दागिने, असा सहा लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 
गुरुवारी (ता. 6) केलेल्या करवाईत सलमान गौस शेख (वय 24, रा. संत कबीर सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी) याला अटक केली. त्यांच्याकडून दीड लाखांच्या पाच दुचाकी, तर अटक केलेल्या राहुल हिरालाल भांडेकर (वय 20, रा. गांधीनगर, खराळवाडी) यांच्याकडून मोबाईल व घड्याळ, असा 13 हजारांचा माल जप्त केला. 

तसेच गुरुवारी केलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये तडीपार गुन्हेगार राहुल अर्जुन गोरे (वय 24, रा. भोंडवे वस्ती, वाल्हेकरवाडी) याला अटक केली. त्याच्याकडून देशी कट्टा जप्त केला, तर स्वप्नील ऊर्फ बाळू नामदेव शेलार (वय 26, रा. दत्तनगर, चिंचवड) या तडीपार गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडील देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, हवालदार राजेंद्यांर भोसले, शाकीर जिनेडी, नागनाथ लकडे, पोलिस नाईक महादेव जावळे, श्च्याराकांत जाधव, संतोष दिघे, राजु जाधव, संतोष भलेराव, राहित पिंजरकर, उमेश वानखडे, विद्यासागर भोते, अविनाश देशमुख, गणेश खाडे, नामदेव राऊत, गणेश करपे, सोमेश्वर महाडीक, विकास रेड्डी, विष्णु भारती, किर्ती घारगे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com