पिंपरीत मतदानासाठी ज्येष्ठांमध्ये उत्साह 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

मशिन बंद पडल्याने रांग 
म्हाळसाकांत विद्यालय केंद्रात दहाच्या सुमारास व्होटिंग मशिन बंद पडले. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना अर्धा तास रांगेत थांबावे लागले. मशिन सुरू झाल्यानंतर पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. 

दीपावली संदेश व सजावट 
मतदानासाठी आलेल्या मतदारांच्या स्वागतासाठी अनेक केंद्रावर शुभ दीपावलीचा संदेश देणारी रांगोळी काढली होती. काही केंद्रावर आकर्षक सजावटही केली होती.

पिंपरी : ज्येष्ठांची गर्दी आणि तरुणांचा निरुत्साह असे वातावरण मतदानाच्या दिवशी पिंपरी विधानसभा मतदार संघात बघायला मिळाले. 
सलग दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने मतदानाच्या दिवशी उघडीप दिली. त्यामुळे सकाळी दहानंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. 
शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. त्यामुळे पाऊस येईल या शक्‍यतेने मतदार सकाळी बाहेर पडले नाहीत. त्यामुळे केंद्रांवर सकाळी सात ते नऊ या वेळेत अवघ्या तीन ते चार टक्‍के मतदानाची नोंद झाली. दहानंतर गर्दी वाढली. 
मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली होती. त्यामुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्रांवर ज्येष्ठांचीच गर्दी होती. 

मशिन बंद पडल्याने रांग 
म्हाळसाकांत विद्यालय केंद्रात दहाच्या सुमारास व्होटिंग मशिन बंद पडले. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना अर्धा तास रांगेत थांबावे लागले. मशिन सुरू झाल्यानंतर पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. 

दीपावली संदेश व सजावट 
मतदानासाठी आलेल्या मतदारांच्या स्वागतासाठी अनेक केंद्रावर शुभ दीपावलीचा संदेश देणारी रांगोळी काढली होती. काही केंद्रावर आकर्षक सजावटही केली होती. 

वाहतूक कोंडी 
मतदारांना स्लिपा देण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी कॅम्प परिसरात रस्त्यालगत बूथ केले होते. तेथे मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. बूथवर तरुण कार्यकर्त्यांची संख्या कमी होती. 

सेल्फी पॉइंटवर गर्दी 
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर सेल्फी घेण्यासाठी पॉइंट केला होता. तेथे मतदार रांगा लावून सेल्फी काढतानाचे चित्र होते. 

पिंपरीत तीनपर्यंत 31.28 टक्‍के मतदान 
पिंपरी मतदार संघात सकाळी सात ते नऊ या वेळेत अवघे तीन ते चार टक्के तर अकरानंतर त्यात थोडी भर पडली. दुपारी एकपर्यंत अनेक भागातील मतदानाचा आकडा 20 ते 21 टक्‍यांवर होता. दुपारी तीनपर्यंत इथे 31. 28 टक्‍के मतदानाची नोंद झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri assembly atmosphere