Coronavirus:पिंपरीत कडकडीत बंद

pimpri-band
pimpri-band

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील किराणा-माल, भुसार, औषधे, भाजीपाला यासारख्या अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच दैनंदिन व्यवहार सलग तिसऱ्या दिवशी ठप्प राहिले. महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी जागोजागी गस्त घालून चालू दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे शहरात पूर्णपणे शांतता आणि शुकशुकाट राहिला.  

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
  
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने फेडरेशन ऑफ पिंपरी-चिंचवड या शिखर संघटनेने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बुधवारी (ता. १८) आणि गुरुवारी (ता. १९) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहरातील पिंपरी कॅम्प वगळता बहुतेक ठिकाणी बंद पाळण्यात आला.

पिंपरी कॅम्प येथील कापड दुकाने गुरुवारी व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने आणि पालिका- पोलिसांच्या कारवाईने बंद केली होती. सर्व दुकाने शुक्रवारी (ता. २०) परत सुरू होणार किंवा नाही, याबद्दल साशंकता होती. मात्र, महापालिका आणि पोलिस यांच्या संयुक्त पथकांनी कडक भूमिका घेतली. जेथे दुकाने चालू दिसतील, अशा ठिकाणी जाऊन पथकांनी दुकाने बंद करा, अन्यथा गुन्हे दाखल होतील, असा इशारा दिला. त्याचे दृश्‍य परिणाम लगेच सर्वत्र दिसले. 

पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कार्यालयीन अधीक्षक हनुमंत सरवदे म्हणाले, ‘‘शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत महापालिका आणि पोलिस यांची आठ संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात १५ ते २० कर्मचाऱ्यांचा अंतर्भाव आहे. सर्वत्र गस्त घालून आम्ही दुकाने बंद ठेवण्यास सांगत असून, त्याला दुकानदारांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. पिंपरी कॅम्प येथे तुरळक दुकाने चालू होती. ती दुकानेदेखील आम्ही बंद केली आहेत. या कारवाईचे व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले आहे.’’

‘‘देशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये सापडले आहेत. लोकांची सत्वपरीक्षेचा हा काळ आहे. कोणतेही निर्बंध लादून घेण्याऐवजी लोकांनी स्वतःहून बंधने घालून घेतली पाहिजेत. आणखी काही दिवस बंधने पाळल्यास या जागतिक महामारीला अटकाव होऊ शकेल. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत बंद चालूच राहील. सर्व नागरिकांनी सहकार्य करून सरकारने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करावे.’’
- गजानन बाबर, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएनशन्स ऑफ पिंपरी-चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com