Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये सिलेंडरची घरपोच सेवा कोलमडली

Cylinder
Cylinder

डिलिव्हरी बॉय गावी : आगाऊ बुकिंगमध्ये दुप्पट वाढ
पिंपरी - कोरोनाच्या धास्तीने शहरातील सिलेंडर पुरवठा करणारे सत्तर टक्क्यांच्यावर डिलिव्हरी बॉय गावाला गेले आहेत. परिणामी, घरपोच सिलेंडर पुरवठा सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. सिलेंडरचा साठा मोठ्या प्रमाणात असूनही नागरिकांनी आगाऊ सिलेंडर बुकिंग करून गर्दीत आणखी भर पाडली आहे. त्यामुळे, पुरवठादारही हतबल झाले आहेत.

सांगवी, कासारवाडी, पिंपळे-गुरव, चिंचवडसह शहरात सिलेंडरची मागणी अचानक दुपटीने वाढली आहे. त्यामुळे घरपोच सिलेंडर सेवा न देता ठराविक एका चौकात सिलेंडर गाडी उभी केली जात असल्याने नागरिक चौकाचौकात धाव घेत आहेत. काहीजण सिलेंडर दुचाकीवर नेत आहेत तर काहींकडे वाहतुकीची सोय नाही. त्यामुळे पंचाईत झाली आहे. बऱ्याच जेष्ठांचे हाल होत आहेत. सिलेंडरसाठी घराबाहेर पडल्यासही पोलिस प्रसाद देत आहेत.

घरगुती सिलेंडर पुरवठा करण्याऱ्या भारत गॅस व एचपी गॅसचे बरेच कर्मचारी लॉकडाऊनमुळे काम सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे, नागरिकांना सिलेंडर मिळण्यास विलंब होत आहे. सिलेंडर पुरवठा अपुरा असल्याची अफवा पसरवली जात आहे. एजन्सीमध्ये सिलेंडरसाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत जादा दाराने सिलेंडर विक्री केल्याचे प्रकार घडत आहेत. तातडीची गरज असेल तरच सिलेंडर घेण्यासाठी बाहेर पडावे असे आवाहन एजन्सीने केले आहे, तरीही गर्दीत वाढ होत असल्याचे चित्र आहे. 

सांगवी येथे राहणाऱ्या श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले की, 'सिलेंडर थोडे दिवस उशिरा मिळाला तरी चालेल. पण घरपोच सेवा दयावी.  सध्या घराबाहेर पडणे अवघड आहे.'

सिलेंडर धारकांसाठी सोशल मीडियावरील संदेश
आकुर्डी गावठाणमध्ये घरोघरी सिलेंडरचे वाटप होईल. दत्तवाडी, विठलवाडी विवेकनगर, क्रांतीनगर , श्रीकृष्ण नगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन ( फार गरज असेल त्यांनीच) सिलेंडर घ्यावे. सरकार कडून नियमित पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये व गर्दी करू नये. 3 ते 4 फुटाचे अंतर ठेवावे. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे सिलेंडर पुरवठा करणाऱ्या आकुर्डीतील एचपी गॅस एजन्सी व संबधीत नगरसेवकाने सोशल मीडियावरून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com