बघा पिंपरी चिंचवडमध्ये सर्वेक्षणात किती नव्या मिळकतींचा शोध लागला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने १८ हजार ६०० बिगरनिवासी मिळकतीचे सर्व्हेक्षण केले आहे. यात नवीन ४ हजार ७५० बांधकामे, ९०० वाढीव बांधकामे आणि वापरात बदल केलेल्या ३६० बांधकामे अशा ६ हजार १० मिळकतींचा शोध लागला आहे. याबरोबरच पाच लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

पिंपरी - महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने १८ हजार ६०० बिगरनिवासी मिळकतीचे सर्व्हेक्षण केले आहे. यात नवीन ४ हजार ७५० बांधकामे, ९०० वाढीव बांधकामे आणि वापरात बदल केलेल्या ३६० बांधकामे अशा ६ हजार १० मिळकतींचा शोध लागला आहे. याबरोबरच पाच लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

शहरातील बिगरनिवासी मिळकतींची सर्व्हेक्षण मोहीम ११ नोव्हेंबरपासून हाती घेतली आहे. शनिवारपर्यंत (ता. ७) ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अद्याप त्यांचे मिळकतीचे नवीन, वाढीव, वापरातील बदल करसंकलन विभागाकडे नोंदवून आकारणी केलेली नाही, अशा मिळकतधारकांनी सर्वेक्षण करणारे कर्मचारी अथवा संबंधित विभागीय कार्यालयात लेखी अर्ज करून करआकारणी निश्‍चित करून घ्यावी. तसेच सर्वेक्षणाच्या कामकाजास विरोध अथवा अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ‘‘नागरिकांनी याबाबत ९८९०३५०६६२ या क्रमांकाच्या व्हॉट्‌सॲपवर मिळकतीचे पत्त्यासह फोटो अपलोड करावेत. मिळकतधारकांनी थकबाकीचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे. मिळकत जप्तीची कारवाई टाळावी,’’ असे आवाहन कर संकलन विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pimpri Chinchwad, how many new properties were discovered in the survey