पिंपरी: महापालिकेचे शहरातील 218 व्यापारी गाळे वापराशिवाय पडून 

दीपेश सुराणा
शनिवार, 15 जुलै 2017

"शहरातील विविध ठिकाणी पडून असलेल्या व्यापारी गाळ्यांचा वापर व्हावा, यासाठी पाठपुरावा करणार आहे. संबंधित गाळ्यांच्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी शनिवारी (ता.15) दुपारी 3 वाजता भूमी व जिंदगी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.'' 
- नितीन काळजे, महापौर. 

पिंपरी - महापालिकेचे शहरातील विविध ठिकाणी असलेले 218 व्यापारी गाळे सध्या वापराशिवाय पडून आहेत. संबंधित गाळ्यांसाठी फेरनिविदा मागविण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच, गाळ्यांचा भाडेदर कमी करण्याबाबत भूमी व जिंदगी विभागातर्फे आढावा घेण्यात येत आहे. 

महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 742 व्यापारी गाळे आहेत. त्यातील महापालिकेच्या वापरात 77 गाळे आहेत. तर, 303 गाळे भाडेपट्ट्याने (लीज तत्त्वावर) दिले आहेत. दरमहा भाडेतत्त्वावर 144 गाळे वितरित केले आहेत. 218 व्यापारी गाळ्यांचा मात्र विविध कारणांनी वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. निविदेला अल्प प्रतिसाद, सुरू असलेली निविदा कार्यवाही, निविदा काढणे बाकी, अपेक्षित लिजदराचा अभाव अशा विविध कारणांमुळे या गाळ्यांचे वितरण बाकी असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

* वापराशिवाय पडून असलेले गाळे (क्षेत्रीय कार्यालय निहाय) : 
क्षेत्रीय कार्यालय व्यापार संकुल रिक्त गाळे 
अ) 1)कै. पांडुरंग काळभोर सभागृह (आकुर्डी) 21 
2) संत तुकाराम व्यापार संकुल (निगडी) 2 
3) अजंठानगर श्रेणीवाढ योजना 9 
4) मुकाई चौक (किवळे) बीआरटी 1 
बस टर्मिनलमधील गाळे 
------------------------------------------------------------------ 
ब) 1) पिंपरी भाजी मंडई पहिला मजला 96 
2) थेरगाव उद्यानातील फूड स्टॉल 4 
---------------------------------------------------------------- 
क) 1) संत तुकारामनगर गोल मार्केट 6 
2) सांगवी शाळा इमारत व्यापारी गाळे 1 
3) सांगवी, सर्व्हे क्र. 6, 
उद्यानातील फूड स्टॉल 3 
--------------------------------------------------------------- 
ड) 1) पिंपरी वाघेरे व्यापार संकुल, 
नवमहाराष्ट्र शाळेजवळ, पिंपरी. 7 
2) पिंपरी उड्डाणपुलाखालील गाळे 30 
3) पिंपरी वाघेरे व्यापार संकुल, 3 
अशोक टॉकीजजवळ, पिंपरी. 
4) पिंपरी वाघेरे रिटेल मार्केटमधील गाळे 8 
5) पिंपरीतील व्यापारी गाळे 
(आरक्षण क्र. 155) 27 
--------------------------------------------------------------- 
इ - - 
-------------------------------------------------------------- 
फ - - 
-------------------------------------------------------------- 
एकूण 218 
-------------------------------------------------------------------- 

"शहरातील विविध ठिकाणी पडून असलेल्या व्यापारी गाळ्यांचा वापर व्हावा, यासाठी पाठपुरावा करणार आहे. संबंधित गाळ्यांच्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी शनिवारी (ता.15) दुपारी 3 वाजता भूमी व जिंदगी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.'' 
- नितीन काळजे, महापौर. 

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation