कुदळवाडीत ८ बांधकामे जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

चिखली- पिंपरी-चिंचवड महापालिकेने शुक्रवारी (ता. २९) अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. त्यात कुदळवाडी येथील सुमारे ५०० चौरस फुटांची आठ बांधकामे पाडली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात केलेल्या कारवाईमुळे विशेष विरोध झाला नाही. 

शहरातील अनधिकृत बांधकामांना संबंधित आधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक आधिकाऱ्यांनी प्रभागातील अनधिकृत बांधकामे नियंत्रित ठेवावीत, असे आदेश देऊन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. तसेच ती पाडण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यानुसार कारवाई करण्यात आली. फ प्रभागाचे उपअभियंता अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. 

अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई सुरू असली तरी शुक्रवारी चिखली परिसरात अनेक मोठी बांधकामे सुरूच होती. नोटीस देताच राजकीय मंडळी दबाव आणतात. त्यामुळे अनधिकृत बांधकामाची एखादी भिंत पाडून काढता पाय घ्यावा लागतो. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा बांधकामे सुरू होतात. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर, अशी आमची परिस्थिती होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Pimpri-Chinchwad Municipal Corporation took action on unauthorized construction