विभागीय आयुक्त म्हणतात, पिंपरी-चिंचवड महापालिकेची 'वॉर रुम' म्हणजे...

com.jpg
com.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'कोविड 19 वॉर रुम'ची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पाहणी केली व कामकाजाचे कौतुक केले. तसेच, कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा केली.

महापालिकेचने 'कोविड 19 वॉर रुम तयार केली आहे. तसेच, कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेलिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), डेलिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) आदी वैद्यकीय सुविधा सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ घेतलेल्या नागरिकांची संख्यात्मक माहिती डॉ. म्हैसेकर यांनी घेतली. नागरिकांना होमक्वारंटाइन करताना विशेष दक्षता घ्यावी, त्यांच्या जीपीएस ट्रॅकींगवर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फ्लू सेंटरमध्ये तपासणी केलेले रुग्ण, कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पीटल येथील खाटांची व्यवस्था, महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या स्वॅब तपासणीसाठी आतापर्यंत घेण्यात आलेले सॅम्पल, त्यातील पॉझिटीव्ह, निगेटीव्ह, प्रलंबित सॅम्पल ची संख्या, आतापर्यंतचे पॉझिटीव्ह, निगेटीव्ह व मृत रुग्ण, दैनंदिन वाढत जाणा-या केसेस, जनजागृतीसाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना, स्थलांतरित मजुरांसाठीचे निवारा केंद्रे, याबाबतची माहिती हर्डीकर यांनी दिली. कोरोना विषयक कामासाठी जवळपास दोन हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com