पिंपरी-चिंचवड पोलिस आले ट्‌विटरवर, फॉलो करा @PCcityPolice

twitter News.jpg
twitter News.jpg

पिंपरी :  पुणे पोलिसांपाठोपाठ आता पिंपरी चिंचवड पोलिसांनीही ट्विटर अकांऊट सुरु केले आहे. Pimpri Chinhwad Police असे ट्‌विटरचे प्रोफाईल नाव असून @PCcityPolice असे ट्विटर हँडल आहे. कित्येक दिवस येथील नागरिक पिंपरी चिंचवड पोलिसांनीही ट्विटर अकांऊट सुरु करावे अशी मागणी करत होते. अखेर त्याला मुहुर्त लागला आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांना पोलिसांशी संपर्क करता यावा तसेच पोलिसांचे उपक्रम, सूचना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे. 

नागरिक आणि पोलिस यांच्यातील संपर्क वाढावा यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच नागरिकांना त्यांच्या सूचना, तक्रारी पोलिसांकडे मांडता याव्यात, पोलिसांच्या कामगिरीची माहिती नागरिकांना मिळावी. तसेच आयुक्तालयाची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी आता ट्विटर अकाउंट सुरु केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com