पिंपरीमधून गौतम चाबुकस्वार तर चिंचवडमधून राहुल कालाटे आघाडीवर Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पिंपरी विधानसभेचे मतमोजणीला सकाळी ८ वाजता बालेवाडी येथे सुरुवात झाली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत पहिल्या फेरीत शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार हे १६६९ मतांनी आघाडीवर आहेत. पिंपरीमध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार विरुद्ध राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब गायकवाड यांच्यात तिरंगी लढत आहे.

पहिली फेरी
गौतम चाबुकस्वार (शिवसेना) – ५६८०
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी) – ४०११
बाळासाहेब गायकवाड (वंचित) – १५४

चिंचवड विधानसभा
पहिली फेरी
लक्ष्मण जगताप 6050
राहुल कालाटे 6336
286 मतांनी राहुल कालाटे आघाडीवर

पिंपरी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांना १५४ मते.

भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार महेश लांडगे हे पहिल्या फेरीत ४ हजार ३८७ मतांनी आघाडीवर आहेत. 

पहिल्या फेरीत लांडगे यांना ८ हजार ४८१ मते मिळाली. त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना ४०९४ मते पडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad vidhansabha constetuency Gautam Chabukswar Rahul kalate