पिंपरी ते दिल्ली सायकल मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मार्च 2019

पिंपरी - बीएसआर्स स्पर्श फाउंडेशन आणि रोटरी क्‍लब ऑफ लोकमान्यनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रियांच्या सन्मानार्थ आयोजित ‘पेडल फॉर चेंज’ या पिंपरी-चिंचवड ते दिल्ली सायकल मोहिमेला सुरवात झाली.

पिंपरी - बीएसआर्स स्पर्श फाउंडेशन आणि रोटरी क्‍लब ऑफ लोकमान्यनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रियांच्या सन्मानार्थ आयोजित ‘पेडल फॉर चेंज’ या पिंपरी-चिंचवड ते दिल्ली सायकल मोहिमेला सुरवात झाली.

ऑटो क्‍लस्टर येथे मोहिमेला झेंडा दाखविण्यात आला. पिंपरी-चिंचवड लघू उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, रोटरीचे माजी प्रांतपाल सुबोध जोशी, रोटरी क्‍लब लोकमान्यनगरच्या अध्यक्षा वासवी मुळे, देवानंद देशमुख, स्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष व समन्वयक भूपेंद्रसिंग राठोड यावेळी उपस्थित होते. या वेळी राठोड म्हणाले, की महिलांवर अत्याचार खूप होतात. स्त्री कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, स्त्री अत्याचारावर आवाज उठावा, इंधन बचत, आरोग्य, पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने या सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.

या मोहिमेत एकूण २० सायकलपटू सहभागी झाले आहेत. त्यामध्ये नऊ ज्येष्ठ नागरिक, दोन महिलांचा सहभाग आहे. मुंबई, गुजरात, राजस्थानमार्गे दिल्ली येथे सायकलपटू जाणार आहेत. सायकलपटूंना डेक्कन जिमखाना रोटरीचे प्रांतपाल शैलेश पालेकर, नियोजित प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सलोनी जैन हिने सूत्रसंचालन केले. अजय वाघ यांनी आभार मानले. 

या मोहिमेत भूपेंद्रसिंग राठोड, तानाजी सावंत, अनिल पिंपळेकर, पद्माकर आगाशे, स्मिता मलठणकर, दीपा शेंबेकर, अनिल जोशी, अविनाश मेढेकर, सुहास सोमण, लवेश कुमार, संजय कट्टी, मिलिंद सैंदाणे, डॉ. सुभाष कोकणे, दिग्विजय जोधा, अक्षय घोरपडे, अनंत कुंभारे यांनी भाग घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri to Delhi Cycle Campaign